मुसळधार पावसामुळे मुंबई पुण्याला झोडपले आहे. काही तासांच्या पावसानंतर मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र समोर आले. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या तर काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत रेल्वेची वाहतूक सुरु होती. रस्त्यावरही हीच स्थिती पाहायला मिळाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. दरम्यान साचलेल्या पाण्यातूनच वाहानांची ये-जा सुरु होती. दरम्यान ठाण्यामध्ये साचलेल्या पाण्यातूनधावणाऱ्या बसचा व्हिडिओ चर्चे आला आहे. बसमध्ये पाणी शिरल्याचे स्पष्ट पणे दिसत आहे. अशा स्थितीमध्ये काही प्रवासी प्रवास करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. साचलेल्या पाण्यातून वाट काढत अनेक चाकरमान्यांनी कामावर हजेरी लावली. दरम्यान साचलेल्या पाण्यातून धावणाऱ्या बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पातलीपाडा येथील ठाण्यातील असून टीएमटी बसचा आहे. बसमध्ये प्रवासी बसलेले दिसत आहे. बसचा दरवाजा उघडा आहे. ज्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी दिसत आहे. रस्त्यावरील पाणी बसमध्ये शिरत आहे. प्रवासी साचलेल्या पाण्यात बसलेले दिसत आहे. इंस्टाग्रामवर buddhabhushan_sitale नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले केले.

हेही वाचा – ‘एक चूक आणि…’ धबधब्यावर रील बनवणाऱ्या तरुणाचा गेला तोल; पुढे जे घडलं VIDEO पाहून अंगावर येईल काटा

मुंबईच्या पावसाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. खारगर येथील भुयारी मार्गात पाणी शिरल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – “आयुष्यात एका सेंकदाची किंमत काय?”, क्षणार्धात झालं असतं होत्याचं नव्हतं, बाईक राईडरचा थरारक Video Viral

तसेच विरारमधील एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये लोक चक्क नाव घेऊन साचलेल्या पाण्यात उतरले आहेत.

अनेक ठिकाणी जोरदार पाण्यामध्ये कार अडकल्याचे दिसत आहे. दरम्यान अनेक जण जीव वाचवण्यासाठी कारवर चढल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rain water entered the bus in thane heavy rains in virar force people to use boats to navigate clogged waterways see viral video snk