Andheri subway flooding: मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलचे झोडपून काढलं. शनिवारी मुंबईत ११५.८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या ४८ तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. पहिल्याच पावसात मुंबईतल्या मान्सूनपूर्व तयारीचा यंत्रणांचा दावा मात्र फोल ठरला. किंग्स सर्कल, अंधेरी सबवेजवळ सखल भागात पाणी साचले. तर वाहतुकीलाही पाणी साचल्यानं मोठा फटका बसला. याच पावसातील अंधेरी सबवेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईमध्ये कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईतील अंधेरी भागातही काल जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. पहिल्याच पावसामुळे अंधेरीतील सबवे पाण्याखाली गेलाय. काल जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे अंधेरीतील सबवे परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. पाणी वेगाने पुढे सरकत होतं. मुंबईतील मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले परिसरात काल जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या ४८ तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Versova Ghatkopar metro time table changes
मतदानाच्या दिवशी वर्सोवा-घाटकोपर मेट्रोच्या वेळेत बदल, पालिकेच्या विनंतीनतर मेट्रो प्रशासनाचा निर्णय, पहिली लोकल पहाटे ४ वाजता सुटणार
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral Video : क्रूरतेचा कळस! कुत्र्याला पायाला धरुन गोल गोल फिरवलं, अन् शेवटी…

मुंबईतील भुयारी मार्गांमध्ये पाणी साचू नये, यासाठी पालिकेने पावसाआधीच तयारी केली.मुंबईतील मालाड, अंधेरी आणि मिलन सबवेजवळ बीएमसीने पंपिंग मशीन बसवल्या आहेत.पाऊस सुरू होताच हे पंपिंग मशीन सुरू केलं जातं आणि भुयारी मार्गात साचलेले पाणी हे मशिन बाहेर काढण्यात येतं. या प्रकारच्या पंपिंग मशीन भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला बसवण्यात आल्या आहेत. मात्र तरिही दरवर्षी प्रमाणे यंदाही या भागात पाणी साचतं आहे, त्यामुळे नागरिकांकडून मात्र संताप व्यक्त होतोय.