पावसाळ्यातील सर्वसामान्य स्थितीच्या तुलनेत निराळी स्थिती निर्माण झाल्यामुळे गेले दोन दिवस मुंबईत वादळी पाऊस झाला. दिवसभरात केवळ रिपरिप सुरू असली तरीही रात्रीपासून ते सकाळ होईपर्यंत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. रविवारी सायंकाळी सुरु झालेला पाऊस मध्य रात्रीपर्यंत जोरदार बरसला. रात्री १२ नंतरही पावसाची रिपरिप सुरुच राहिली. या पावसामुळे रविवारी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये ३३ जागरिकांचा बळी गेला. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात पाणीही साचलं. विशेष म्हणजे या पावसाचा फटका केवळ मुंबईकरांना बसला असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्राण्यांनाही बसलाय. याच मुसळधार पावसाचा प्राण्यांना बसलेल्या फटक्याची झलक दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा