In Bhandup a Man lost balance due to water flow: मुंबईत काल (२५ सप्टेंबर)पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच रेल्वे रुळांवर पाणी साठल्याने लोकल सेवा विस्कळित झाली आणि प्रवाशांचे हाल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईसह पुणे व कोकणातही पावसाने थैमान घातले असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठिकठिकाणी पाणी साठल्याने कामावर गेलेल्या मुंबईकरांना घरी परतण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. सध्या सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. वसई-विरार ते भांडुप-कल्याणपर्यंत मुंबईची ‘तुंबई’ झाली होती.

हेही वाचा… Mumbai Rains: १ किमीच्या अंतरासाठी रिक्षाचालकाने घेतले तब्बल ‘इतके’ रुपये; मुसळधार पावसाचा VIDEO शेअर करत नेटकरी म्हणाला, “३ महिने…”

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू होती. अशातच मिनी कोकण म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडुपमध्येही पाणी साठलं होतं. पाण्याखालचा रस्ता दिसेनासा झालेला आणि त्यामुळे मोठा अपघात होण्याचीदेखील शक्यता होती. सध्या सोशल मीडियावर भांडुपमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जिथे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एका माणसाचा तोल गेला आणि तो खाली पडला.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. मिनी कोकण म्हणून प्रचलित असलेलं भांडुप या मुसळधार पावसामुळे डुंबून गेलं आहे. रेल्वेस्थानकावर, रस्त्यांवर जागोजागी पाणी साठल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. या व्हिडीओत कमरेइतक्या पावसाच्या पाण्यात माणसं चालताना दिसतायत. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे माणसांना एका जागी स्थिर उभे राहणंही अशक्य झालं आहे. तरीही त्यातून मार्ग काढून माणसं आपापल्या घरी परतण्यासाठी जीवाच रान करीत आहेत. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस पावसाच्या या साठलेल्या पाण्यातून इच्छित स्थळी चालत जात असताना त्याचा अचानक तोल जातो आणि तो खालीच कोसळतो.

हा व्हायरल व्हिडीओ @beingkokani_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या ‘मिनी कोकणमध्येच चाकरमानी थोडक्यात बचावले’, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… चिमुकल्याचा प्रताप! शिडीवरून खाली वाकून पाहताना गेला तोल अन्…, VIDEO पाहून उडेल थरकाप

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आपले अनुभव सांगत प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “मी तर अजून ट्रेनमध्येच अडकलो आहे.” तर, दुसऱ्यानं “भांडुप रेल्वेस्टेशनला खूप पाणी आहे”, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “आताच मी या मिनी कोकणमधून आलो.”

दरम्यान, हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करून शहरातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आवश्यकता असेल, तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rains in bhandup a man lost balance due to heavy rains and water flow viral video dvr