Mumbai Rain 2023 : मुंबई आणि पावसाचे एक अनोखे नाते आहे. मुंबईवर निसर्गाने अशी काही किमया केली आहे की, ज्यामुळे कोणत्याही ऋतूत मुंबईत अचानक पावसाला सुरुवात होते. आता उन्हाळ्यातही मुंबईकरांची पावसापासून सुटका होऊ शकलेली नाही. मुंबईत आज (शुक्रवारी) सकाळी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या रिमझिम सरी बरसण्यास सुरुवात झाली. मुंबई, ठाण्यासह काही भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. पावसाच्या एक-दोन छोट्या सरी बरसल्यानंतर दिवसभर कडक उन पडले. पण मे महिन्यातील प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे आज मुंबईत काही तास अल्हाददायक व सुखकर वातावरण निर्माण झाले होते. पण पावसाच्या सरी बरसत नाही तोवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आनंदच आनंद पाहायला मिळाला. नेटिझन्सनी सोशल मीडियावर मुंबईत मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामुळे पावसाच्या आकर्षक फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भरू गेले आहे. या पावसामुळे ट्विटरवरही मीम्सचा जणू काही महापूर आल्याचे चित्र आहे. अनेक यूजर्स मुंबईतील पावसाचे मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. यामुळे #MumbaiRains वर मजेदार जोक्स आणि मीम्सने नागरिकांनी ट्विटरवर गर्दी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळपासून #MumbaiRains हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंड करू लागला आहे. अनेक नेटिझन्स आता आजच्या पावसाच्या परिस्थितीचे वर्णन करणारे मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. यात चित्रपट, मालिकांमधील व्यक्तिरेखांचे फोटो वापरून मजेदार मीम्स शेअर करत आहेत. चला तर पाहू मुंबईच्या पावसावरील मजेशीर मीम्स आणि पोस्ट…

मुंबईतल्या संकटाचे दुसरे नाव म्हणजे पाऊस. मुंबईकरांना आता पावसाची एक प्रकारे सवयच झाली असून ते त्यासाठी आता तयारच असतात. अनेक मुंबईकर बॅगमध्ये मोबाइल घेऊन जातात त्याप्रमाणे आता छत्रीही घेऊन जाताना दिसतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rains memes 2023 mumbai rains memes flood twitter after city wakes up to light showers on friday sjr