Mumbai Rains Trending: मुंबईला बुधवारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढले. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करून शहरातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संततधारेमुळे सगळीकडे पाणी साचले असून सार्वजनिक वाहतूक विस्कळित झाली आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून प्रवास करणे प्रवाशांना कठीण झाले होते. पूर्व उपनगरांतील रेल्वेस्थानकांवर साठलेल्या पाण्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे रुळांवर पाणी साठल्याने काही ठिकाणी लोकल उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर गेलेल्या मुंबईकरांना घरी परतण्यासाठी खूप धडपड करावी लागली. मुंबईकरांनी सोशल मीडियावर ठिकठिकाणचे मुसळधार पावसाचे, तसेच साठलेल्या पाण्याचे व्हिडीओ शेअर करीत दिवसभर काम करून थकून-भागून घरी येताना किती त्रास सहन करावा लागला याचा अनुभव शेअर केला आहे.

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल

हेही वाचा… चिमुकल्याचा प्रताप! शिडीवरून खाली वाकून पाहताना गेला तोल अन्…, VIDEO पाहून उडेल थरकाप

मुंबईतील मुसळधार पावसामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओंचा पूर आला आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे; ज्यात एका युजरच्या नातेवाइकाने एक किलोमीटरच्या प्रवासासाठी रिक्षावाल्याला तब्बल ३०० रुपये भाडे दिले.

व्हायरल व्हिडीओ

एका सोशल मीडिया युजरने त्याच्या नातेवाइकाचा रिक्षामध्ये प्रवास करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करीत या युजरने असेही सांगितले की, मध्य मुंबईतील रेल्वेस्थानकापासून एक किमीचा प्रवास करून घरी पोहोचण्यासाठी माझ्या नातेवाइकाला तब्बल ३०० रुपये मोजावे लागले.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक रिक्षाचालक पॅसेंजरला घेऊन इच्छित स्थळी पोहोचवण्याच्या प्रयत्नात असल्याचे आपण पाहू शकतो. आजूबाजूला पावसामुळे आधीच खूप पाणी साठले असल्याने रिक्षात बसलेल्या युजरच्या नातेवाइकाने रिक्षाचालकाला विचारलं, “या साठलेल्या पाण्यातून रिक्षा जाईल ना?” त्यावर रिक्षाचालक म्हणाला, “हो जाईल ना; फक्त समोरून बस आली नाही पाहिजे,” असे म्हणत ‘ओम नम: शिवाय’चा जोरात जयघोष करत रिक्षाचालक आपली रिक्षा चालवत राहतो.

हा व्हिडीओ @tanmay_shinde99 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “Mumbai Rains be like- ३ महिने दांडी मारून २ दिवसात सिलॅबस संपवा!” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. तसंच “सध्या खूप मुसळधार पाऊस पडत आहे. हा पाणी साचलेला व्हिडीओ मध्य मुंबईमध्ये राहणाऱ्या माझ्या एका नातेवाईकाने शेअर केला आहे. त्याने स्टेशन ते घरापर्यंत १ किमी ऑटो राइडसाठी ३०० रुपये दिले.” असंही तो पुढे म्हणाला.

हेही वाचा… आजोबा जरा दमानं! धावत्या ट्रेनच्या दरवाजात आजोबांचा धोकादायक स्टंट, VIDEO पाहून उडेल झोप

दरम्यान, हवामान विभागाने आज मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज (२६ सप्टेंबर २०२४) सुटीदेखील जाहीर करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता असेल, तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.