World Highest Temperature: एकीकडे मुंबईत पावसाने जोर धरला आहे. एप्रिल- मे महिन्यात वाढलेल्या उकाड्यानंतर आता जमीन, माणसं, निसर्ग पावसाच्या गारव्याने सुखावत आहेत. अशातच ३ जुलैला जगभरात एका विचित्र विक्रमाची नोंद झाली आहे. यू.एस. नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल प्रिडिक्शनच्या आकडेवारीनुसार, सोमवार, ३ जुलै हा जगभरातील आजवरचा सर्वात उष्ण दिवस होता. जगभरातील आजवरच्या रेकॉर्डनुसार, ऑगस्ट २०१६ मध्ये नोंद झालेल्या १६.९२ सेल्सियस (62.46F) च्या रेकॉर्डला मागे टाकून सोमवारी सरासरी जागतिक तापमान १७. ०१ अंश सेल्सिअस (62.62 फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचले होते.
दक्षिण अमेरिकेत सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. चीनमध्ये ३५ अंश सेल्सियस (95F) पेक्षा जास्त तापमानासह उष्णतेची लाट कायम राहिली. उत्तर आफ्रिकेमध्ये ५० सेल्सियस (122F) इतके तापमान नोंदवले गेले. अगदी अंटार्क्टिका, जिथे सध्या हिवाळा सुरु असणे अपेक्षित आहे पण तिथेही, उच्च तापमानाची नोंद झाली आहे. अर्जेंटाईन बेटांवर सुद्धा जुलैच्या तापमानाचा विक्रम (8.7C/ 47.6F) मोडला आहे.
हे ही वाचा<< वाहनाचे ब्रेक अचानक फेल झाले तर.. ‘या’ ५ टिप्स तुम्हाला माहित असायलाच हव्यात!
दरम्यान, शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, एल निनो पॅटर्नमुळे झालेले हवामानातील बदल वाढलेल्या तापमानाला जबाबदार आहेत.आणि आपल्या सगळ्यांसाठी व मुख्यतः इकोसिस्टमसाठी ही फाशीची शिक्षा आहे. दुर्दैवाने, [कार्बन डायऑक्साइड] आणि हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन आणि एल निनोच्या वाढीमुळे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षीच्या नवीन विक्रमांच्या मालिकेतील हे तापमानाचे आकडे धक्कादायक आहेत असे ‘बर्कले अर्थ’ येथील शास्त्रज्ञ झेके हॉसफादर यांनी सांगितले आहे.