Mumbai Rains Ghatkopar hording collapse: मुंबईमध्ये सध्या वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरु झाल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या जोरदार वादळी वारे सुटल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच पावसालाही सुरुवात झाली आहे. याच दरम्यान मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर मुंबईच्या घाटकोपर भागात भीषण दुर्घटना झाली आहे. घाटकोपरच्या पूर्व द्रुगती मार्गावरील पेट्रोल पंपावर मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं आहे. अवघ्या ५ सेकंदात कोसळलेल्या या होर्डिंगचा थरारक व्हिडीओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे वडाळ्यातही बघता बघता पार्किंग टॉवर कोसळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या दुर्घटनेत होर्डिंगच्या आत अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसंच काही गाड्यांवरही हे होर्डिंग कोसळल्यामुळे गाड्यांचंही नुकसान झालं आहे. यामध्ये जवजवळ ७० ते ८० गाड्या तर ६० कर्मचारी आहेत. जोपर्यत हे बॅनर हटवलं जाणार नाही तोपर्यंत आतमध्ये किती लोक अडकले आहेत याचा अंदाज येणार नाही.

दुर्घटनेमुळे मेट्रो ठप्प

या दुर्घटनेत मेट्रोच्या तारांवर बॅनर कोसळल्याने वाहतूक ठप्प असून घाटकोपर-वर्सोवा मेट्रोही ठप्प झाली आहे. अंधेरीकडून घाटकोपरकडे जाणारी मेट्रो रखडली आहे. दरम्यान अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी आल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्य हाती घेण्यात आले असून जखमींची सुटका केली जात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, राजावाडी रुग्णालयात सुमारे १० ते १५ रुग्ण दाखल केले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Mumbai Rain : मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

वडाळ्यातही पार्किंग टॉवर कोसळला

दुसरीकडे कांजूरमार्ग पूर्वच्या इंदिरानगर भागात एका बिल्डिंगचं छप्परही कोसळलं आहे. तर वडाळ्यातही बघता बघता पार्किंग टॉवर कोसळला आहे. याठिकाणी देखील अग्निशमन दल मदतीसाठी पोहचलं आहे.मुलुंड, भांडूप, कुर्लासह अंधेरी, गोरेगाव, कांदिवलीतही वादळी वारा सुटला आहे. हवामान खात्यानं पुढील दोन ते तीन तासांता वादाळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यांमुळे दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावर झाला आहे. मुंबई विमानतळाचा रनवे बंद करण्यात आला आहे.