Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. रोज वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळत असून यामध्ये काही हसवणारे असतात तर कधी रडवणारे. मात्र यामध्ये काही व्हिडीओ फारच विचित्र असतात. काही लोक प्रसिद्धीसाठी वेगवेगळे स्टंट करत असतात. सोशल मीडियावर रील टाकायचं आणि फेमस व्हायचं, यासाठी तरुणाई काही करायला तयार असते. अशाच एका तरुणीनं मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर भर गर्दी विचित्र डान्स केला आहे. तरुणीचा डान्स पाहून प्लॅटफॉर्मवरचे लोकही थक्क झाले आहेत. काहींना तर तरुणीला काही झालंय का असा प्रश्न पडला. तुम्हीही हा व्हिडीओ बघून डोक्याला हात लावाल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी मुंबईतील एका स्टेशनवर भर गर्दीत सर्वांसमोर अगदी बिनधास्त डान्स करत आहे. यावेळी ती तरुणी डान्स करताना तिच्या बाजूनं जाणारे काकाही घाबरले. तरुणीनं आचनक सुरु केलेला डान्स पाहून काकाही दचकले आणि तिच्याकडे पाहू लागले. तिच्या या डान्सने स्टेशनवरील प्रवासीही चांगलेच वैतागल्याचे पाहायला मिळत आहे. डान्स करताना तिचे हात, पाय कुठे, काय जातायत याचे भान तिला राहिले नाही. अगदी विचित्र उड्या मारून केलेल्या डान्सने जाण्या-येणाऱ्या प्रवाशांना त्रास होतोय याचेही तिला भान नाही.डान्स करता करता ती प्रवाश्यांच्या अदूनमधून कसेही कुठेही डान्स करत सैरावैरा पळते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शेतकऱ्यांनो सावधान! जरा जपून टाका पावलं; एक चूक पडेल भारी, VIDEO पाहून फुटेल घाम

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @ seemakanojiya87 या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai reelstar girl viral dance at raiway station failed to impress public latest viral video srk