तुम्ही कधी रेल्वेमध्ये रेस्टारंटचा अनुभव घेतला आहेत का? मग तुम्हाला आता हा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. रेस्टॉरंट ऑन व्हिल हा रेल्वेने सुरु केलेला नवा उपक्रम आहे. ज्यामध्ये जुन्या रेल्वे डब्यांचे सुशोभीकरण करुन त्याचे दिमाखदार रेस्टॉरंटमध्ये रुपांतर केले जाते. या आधी रेल्वेने सीएसएमटी आणि नागपूर येथे हा उपक्रम राबविला आहे. पण आता अंधेरी आणि बोरिवली उपनगरीय स्थानकांवर देखील रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरु होणार आहेत. पश्चिम रेल्वे (WR) मुंबई विभागातील हे पहिले रेस्टॉरंट ऑन व्हिल्स आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी मिड-डेला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, “बोरिवली आणि अंधेरी स्थानकावर रेल्वे डब्यांसह रेस्टॉरंट-ऑन-व्हील उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहेत. एक अंधेरी येथील गेट 10 येथे पूर्वेलाअसेल, तर एक बोरिवली येथे पूर्वेला, स्थानकाच्या उत्तरेकडे (विरार-एंड) असेल,”
रेस्टॉरंट-ऑन-व्हील्स काय आहे?
रेस्टॉरंट-ऑन-व्हील्स या उपक्रमाअंतर्गत जुन्या रेल्वेच्या डब्यांचे एक सुधारित रेस्टॉरंटमध्ये रुपांतर केले जाते. हा डबा रेल्वे रुळावर बसवला जातो. येथे तुम्हाला उत्तम जेवणाचा अनुभव मिळू शकतो. प्रवासी येथे विविध प्रकारच्या पाककृतींचा आस्वाद घेऊ शकतात. यामध्ये 40 हून अधिक लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. रेस्टॉरंटचे आतील भाग अशा प्रकारे सजवले आहेत की ग्राहकांना थीम-आधारित सेटिंगमध्ये जेवणाचा अनुभव घेता येईल.
सेवेत नसलेले रेल्वे डब्बा वापरून उभारले रेस्टॉरंट
सेवेत नसलेले रेल्वे डब्बा वापरून या रेस्टॉरंटची स्थापना केली आहे. रेस्टॉरंटचे दर आणि मेन्यू रेल्वेने मंजूर केलेल्या बाजार दरांनुसार परवानाधारक ठरवतात. पॅन-इंडियन, कॉन्टिनेंटल आणि इतर खाद्यपदार्थ सामान्यतः उपलब्ध केले जातात आणि रेस्टॉरंट प्रवाशांसाठी आणि सर्व सामान्य लोकांसाठी देखील खुले आहे.
कॉरिडॉर/परिसराची देखभाल करण्यासाठी परवानाधारक जबाबदार आहे आणि त्याने अन्न भेसळ कायदा आणि इतर वैधानिक कायद्यांचे पालन करणे अपेक्षित आहे. सुरक्षेची बाब लक्षात घेऊन, पोर्टेबल अग्निशामक यंत्रे बसवली जातील आणि उपकरणे कशी चालवायची हे कर्मचाऱ्यांना माहित असणे आवश्यक आहे. वेळोवेळी अग्निशामक साधने वेळोवेळी उपलब्ध केले जातील आणि त्याची वैधता रेल्वे अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी केली जाईल.
सीएसएमटी आणि नागपूर येथे उभारले आहे रेस्टॉरंट ऑन-व्हील
”मध्य रेल्वेने (CR) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रेस्टॉरंट ऑन-व्हील उभारले आहे आणि ते आतापर्यंत अनुक्रमे 1,25,000 आणि 1,50,000 ग्राहकांसाठी हे महत्त्वाची खाण्याचे ठिकाणे झाले आहेत.
“सीएसएमटी येथे आठवड्याच्या दिवशी सुमारे 250 ग्राहक येतात आणि आठवड्याच्या शेवटी ही संख्या 350 पर्यंत जाते,” असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
सुतार यांनी सांगितले की, ”दादर पूर्व आणि कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अशी आणखी दोन रेस्टॉरंट उभारण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. पुढील एका वर्षात सर्व सक्रिय झाल्यानंतर, शहरातील स्थानकांवर अशी पाच रेस्टॉरंट्स असतील, ज्यात सीएसएमटी येथील एक रेस्टॉरंट असेल.”
नवीन काळातील पार्किंग सुविधा
मुंबईतील सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे टर्मिनस येथे प्रवेश आणि निर्गमन सोयीस्कर करण्यासाठी,पश्चिम रेल्वेने स्थानकावर प्रवेश-नियंत्रित पार्किंग सुविधा सुरू केली आहे. ठाकूर यांनी सांगितले, ”पार्किंग सुविधेमध्ये यांत्रिक बूम बॅरियर सिस्टम बसवून नियंत्रित प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी आधुनिक लूक दिला आहे. स्थानक इमारतीजवळ प्रवाशांसाठी निश्चित पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट तयार करण्यात आले आहेत. हालचाल सुलभ व्हावी आणि स्थानकाचा परिसर गर्दीमुक्त व्हावा यासाठी ऑटो, टॅक्सी आणि खाजगी वाहनांसाठी खास लेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची जागा याशिवाय, प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पार्किंग परिसरात चोवीस तास सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.”