Mumbai Accident News: सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात, तर काही व्हिडीओ भयानक असतात. मागच्या काही दिवसांपासून भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, असाच एक मुंबईतील काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. रस्ता ओलांडताना दोन तरुणींना कारनं अक्षरश: हवेत उडवलं आहे. काळजाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचं फुटेज आता समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसाला जगभरात अनेक अपघात घडत असतात. यामध्ये काहीजण थोडक्यात बचावतात तर काही गंभीर जखमी होतात. मात्र काहींना आपला जीवदेखील गमवावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना किंवा फूटपाथवर चालताना नेहमी सतर्क राहण्यास सांगितले जाते. तरीही कधी चुकीमुळे किंवा चुकी नसतानाही अनेकांसोबत अपघाताच्या घटना घडतात. अशातच आणखी एका अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे.ही घटना मुंबईतील गावदेवी परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक रस्ता ओलांडताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर बरेच लोकांची ये-जा दिसत आहे. काहीजण रस्ता ओलांडत आहेत. गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात वरदळ दिसत आहे. यावेळी इतरांबरोबरच दोन तरुणीही रस्ता ओलांडताना दिसत आहे. यावेळी रस्ता ओलांडताना अचानक तरुणी पुढे जातात आणि तेवढ्यात कार येते आणि दोन्ही तरुणींना जोरात धडक देते. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुणी उंच हवेत उडून रस्त्यावर कोशळताना दिसत आहेत. याअपघातानंतर दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात

Avinash Tiwari नावाच्या एक्स अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असलेल्या पहायला मिळत आहे. अनेकजण म्हणत आहे, रस्त्यावर गाडी चालवताना कधीही गाफील राहू नये आणि घाईघाईने गाडी चालवू नये. अश्या अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेक भीषण अपघातेही व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai road accident 2 girls injured after being hit by speeding car shocking video goes viral srk