दिवसेंदिवस अपघात घडण्याचं प्रमाण जास्त झालं आहे. कधी काय होईल आणि कसा अपघात घडेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्याला आणि वाहन चालवणाऱ्यालाही सतर्क आणि काळजी बाळगण्याचं सांगितलं जातं.आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरात कुठून ना कुठून अपघाताची घटना समोर येत असते. अतिशय भयानक अपघातांचे व्हिडीओही सोशल मीडियावर खळबळ उडवतात. यामध्ये आणखी एका अपघाताची घटना समोर आलीये. मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका डॉक्टरांचा यात दुर्दैवी अंत झाला आहे. अपघाताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनिवारी हा भीषण अपघात झाला. मुंबईतील कफ परेड येथील बुधवार पार्कजवळ बसने दुसऱ्या बसला धडक दिल्याने एका मॉर्निंग वॉकरचा मृत्यू झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थांबलेल्या वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला. ही दुर्दैवी घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सर्वात दुख:द बाब म्हणजे याा अपघातात एका डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातांतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पोलीस बस ड्रायव्हरची चौकशी करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – निवृत्तीच्या दिवशी ‘बस’ला मिठी मारत ढसाढसा रडला ड्रायव्हर, Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

@kamalmishra ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. दरम्यान डॉक्टरांच्या मृत्यूमुळे नेटकऱ्यांनीही दुख: व्यक्त केलं आहे.