Ghatkopar railway station accident video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- घाई करताना अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. तरीही अनेक प्रवासी पूल चढण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात; पण अशा आततायी कृतीद्वारे अनेक जण अपघाताला आमंत्रण देतात; तर अनेक जण जीवानिशीही जातात.
असाच एक भयंकर अपघात घाटकोपर रेल्वे स्टेशनवर घडला. त्यामध्ये एक व्यक्ती रेल्वेच्या चाकाखाली अडकली आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घाटकोपर रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीचा भीषण अपघात झाला असून, तो रेल्वेच्या चाकामध्ये अडकला आहे. यावेळी ट्रेन थांबवण्यात आली असून, इतर प्रवासी आणि पोलीस त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एवढा भयंकर अपघात पाहून तुम्हीही यापुढे रूळ ओलांडण्याआधी आणि चालत्या गाडीत चढण्याआधी १०० वेळा विचार कराल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ me_ghatkoparkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी टीका केलीय; तर काही जणांनी हळहळ व्यक्त केली आहे.