सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक प्रवासी धावत्या रेल्वेतून चढताना उतरताना अपघाताचे शिकार होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये धावत्या रेल्वेत एक तरुण चढताना दिसतो पण अचानक त्याचा पाय घसरतो, पुढे जे काही घडते, ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (mumbai shocking video of a young boy falls onto tracks trying to catch moving train at Andheri railway station mumbai)
मुंबईत धावत्या रेल्वेमध्ये चढताना तरुणाचा घसरला पाय अन्… (Young Boy Falls onto Tracks Chasing Moving Train)
हा व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण धावत धावत येताना दिसतो आणि धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा पाय घसरतो आणि रेल्वेखाली जाणार तितक्यात दुरवर उभा असलेला पोलीस कर्मचारी धावतो आणि त्याला रेल्वेट्रॅकखालून वर ओढतो. त्यानंतर आणखी एक महिला पोलीस कर्मचारी आणि इतर लोक मदतीला धावून येतात. त्या पोलीस कर्मचार्याच्या तत्परतेमुळे या तरुणाचे प्राण वाचते.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
Jayprrakash Singh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्न नंबर ८ वर लोक शक्ती एक्सप्रेसमध्ये चढताना एका प्रवाशाचा पाय घसरला आणि रेल्वेखाली जात होता पोलीस कर्मचाऱ्याने त्याला वाचवले. या प्रवाशाला अहमदाबाद जायचे होते पण प्लॅटफॉर्मला पोहचला तेव्हा रेल्वे सुटली होती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करताना त्याचा तोल गेला. पण पोलीस कर्माचाऱ्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर या तरुणाला अरावली गाडीने अहमदाबाद येथे पाठवले.”
यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले ज्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे जीव वाचवले आहे. हा तरुण नशीबवान होता की वेळी पोलीस कर्मचारी धावून आले. पण प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.