Mumbai bandra viral video: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईत महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एका धक्कादायक घटनेत, दारू पिलेल्या दिसणाऱ्या एका शर्टलेस पुरूषाने ऑटोरिक्षातून घरी परतणाऱ्या एका महिला प्रवाशाला त्रास दिला. ही घटना शनिवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली जेव्हा तिची गाडी वांद्रे येथील ट्रॅफिक सिग्नलवर थांबली. हा पुरूष तिच्या ऑटोजवळ अन्न मागत होता, परंतु तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर तो भडकला आणि तिची छेड काढू लागला. त्यानं अक्षरश: तिच्या मांडीला अश्लील स्पर्श केला आणि तिच्यावर थुंकला.

महिलेने शहरातील रस्त्यावर झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामुळे मुंबई पोलिसांचे लक्ष वेधले गेले. व्हिडिओमध्ये तो तिच्यावर ओरडताना आणि फुटपाथवरून चालत असताना थुंकताना दिसत होता.व्हिडिओ क्लिप ऑनलाइन शेअर करताना, महिलेने सिग्नलवर तिच्याशी गैरवर्तन केल्याचे सांगितले. ती सांगते, ‘दारू पिलेल्या’ पुरूषाने तिची मांडी धरली आणि तिच्या शॉर्ट ड्रेसवर अश्लील टिप्पणी केली.

“संपूर्ण कपडे घाल मग मी हात नाही लावत”

“एक मद्यपी/भिकारी माझ्या ऑटोजवळ आला आणि मला जेवण मागितलं, यावेळी त्याकडे मी दुर्लक्ष केलं. अचानक त्यानं ऑटोमध्ये येण्याचा प्रयत्न करत जोरात माझी मांडी धरली आणि “खाना दे ना” म्हणतो. तो माझ्यावर ओरडू लागला, तसेच जर तुला कोणी स्पर्श करू इच्छित नसेल तर पूर्ण कपडे घाला, हे भारत आहे, मी तुला जे काही करायचे ते करू शकतो. संपूर्ण कपडे घाल मग मी हात नाही लावत”, असे बोलू लागला. असा महिलेनं दावा करत म्हंटलं आहे. सिग्नल हिरवा झाला आणि ऑटो सुरू झाला तेव्हाही, महिलेला भीती वाटत होती की तो तिचा पाठलाग करेल किंवा गाडीत उडी मारून आणखी काही करेल. सुदैवाने असं काही पुढे झालं नाही.व्हिडिओ समोर येताच, एक्स वापरकर्त्यांनी मुंबई पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.