Mumbai Shivaji Park Viral video : दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क हे मुंबईकर तरुणांचे खेळण्यासाठीचे हक्काचं मैदान आहे. रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसांत या मैदानात क्रिकेटसह इतर अनेक प्रकारचे खेळ खेळणाऱ्या तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि काँक्रिटीकरणामुळे शहरातील मोकळ्या जागा, मैदानं कमी होत असल्याने अनेक तरुण खेळण्यासाठी छत्रपती शिवाजी पार्क मैदानात गर्दी करतात. देशाचा महान क्रिकेट सचिन तेंडुलकरने देखील याच मैदानातून आपल्या क्रिकेट करियरला सुरुवात केली. अनेकांचे करिअर घडवणाऱ्या या छत्रपती शिवाजी पार्काला आता मात्र परप्रांतीय फेरीवाल्यांनी घेराव घातला आहे. पार्कातील खेळाच्या मैदानात अनेक फेरीवाले मुजोरी करत धंदा करताना दिसताय. यात परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुजोरपणाचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात काही फेरीवाले छत्रपती शिवाजी पार्क मैदानात खेळणाऱ्या तरुणांना चक्क माराहाण करताना दिसतायत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संबंधीत फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा