Viral Video: भारत देशाची परंपरा आणि संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. कारण भारतीय परंपरेनुसार विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. हे पाहून अनेक परदेशातील लोकसुद्धा भारतातील लोकांचे राहणीमान, संस्कृती, कला, प्रसिद्ध पदार्थसुद्धा शिकण्याची किंवा विविध धार्मिक स्थळांना भेट देण्याचा उत्साह दाखवतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका रशियन ब्लॉगरने मुंबईतील गणपती बाप्पांच्या ‘श्री सिद्धिविनायक मंदिरा’ला भेट दिली आहे आणि तिचा अनुभव शेअर केला आहे.

रशियन ब्लॉगर मारिया चुगुरोवा, जी सध्या गोव्यात राहते; तिने अलीकडेच मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे. मंदिरात तिने कोणतीही व्हीआयपी एंट्री न घेता, हातात पूजेचं ताट घेऊन सामान्य नागरिकांबरोबर रांगेत उभी राहिली आणि मनोभावे दर्शन घेतले. भक्तांच्या लांबलचक रांगेत सामील होताना तिने आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीशी, त्यांच्या आशा, स्वप्ने आणि प्रार्थना वाहणाऱ्या प्रत्येकाशी एक खोल संबंध जाणवला असे सांगत नक्की काय भावना तिच्या मनात आहेत हे ती शब्दात मांडू शकत नाही, असेदेखील म्हणाली आहे. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
general administration department issued a circular on national heroes anniversaries opposed by mahanubhava corporation
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद! राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयाला विरोध…
shiv sena ubt leader rajan salvi meets uddhav amid buzz of quitting party
रत्नागिरीत पाडापाडीच्या राजकारणाचा ठाकरे गटाला मोठा फटका, राजन साळवींना ठाकरे यांनी झापले, लवकरच भाजपात प्रवेश
Raj Thackeray Post on Savitribai Phule
“निवणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या…”, सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाची मागणी करत राज ठाकरेंचा सरकारला टोला!

हेही वाचा…सोनसाखळी चोरांनी महिलेला नेले फरपटत; उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना; पण VIDEO मागील सत्य काय?

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, भरपूर आशीर्वाद आणि शांत मनासह ती मंदिरातून बाहेर पडली आणि अशा सुंदर मंदिरात येण्याची संधी मिळाली यासाठी तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ रशियन ब्लॉगरच्या @mariechug इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “नमस्ते दोस्तो! आजचा दिवस खरोखरच खास होता, कारण मला मुंबईतील सर्वात आदरणीय आणि प्रतिष्ठित स्थळांपैकी एक श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देण्याची संधी मिळाली”, अशी तिने कॅप्शन दिली आहे. तसेच प्रत्येकाने एकदा तरी येऊन मुंबईतील गणपती बाप्पाच्या या मंदिराला भेट द्यावी, असे आव्हान करताना व्हिडीओत दिसून आली आहे.

मुंबईतील प्रभादेवी येथील ‘श्री सिध्दिविनायक’ हे केवळ मुंबईकरांचेच नव्हे; तर देशभरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सगळे जण सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन त्याच्या आशीर्वादाने शुभ कामाची सुरुवात करतात. काही जण संकष्टीच्या दिवशी दूरवरून अनवाणी येतात आणि तासन् तास रांगेत उभे राहून गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन जातात. भक्तगणांच्या चेहऱ्यावर बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच चमक दिसते. तर आज रशियन ब्लॉगरनेसुद्धा हा अनुभव घेतला आणि तिचा हा खास अनुभव इन्स्टाग्रामवर व्हिडीओद्वारे तिने शेअर केला आहे.

Story img Loader