Mumbai Taxi Meter Fraud Viral Video: मुंबईत टॅक्सीने प्रवास करताना टॅक्सीचालकाकडून प्रवाशांची लूट झाल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. जवळचे भाडे नाकारणे, मुख्य रस्त्यावरच सोडणे, जवळचा रस्ता असताना जाणूनबुजून वळसा मारुन नेणे असे अनेक प्रकार टॅक्सीकांकडून घडतात. त्याचबरोबर मीटर न वापरता मनमानी भाडे आकारणे आणि मीटरमध्ये छेडछाड करण्याचेही प्रकार अनेकदा समोर येतात. असाच धक्कादायक प्रकार मुंबईतील एका टॅक्सीचालकाकडून सुरु होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होच आहे. यात एक टॅक्सी चालक मीटरमध्ये छेडछाड करुन प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप एका प्रवाशाने केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबईतील असून तो प्रवाश्याबरोबर असलेल्या सहप्रवाश्याने शूट केला आहे. या व्हिडीओमधील प्रवाश्याने आरोप केला की, या टॅक्सी ड्रायव्हरने गिअरजवळ एक बटन बसवले आहे, हे बटण तो मध्येमध्ये दाबतो, बटण दाबल्यानंतर मीटरवरील आकडा वाढतो, अशाप्रकारे मीटरा आकडा वाढवून ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेतले जातात.

Taxi Driver Fight With Police Man On Toll Plaza In Jharkhand shocking Video goes Viral
“नादाला लागू नको तुझी नोकरी खाऊन टाकेन” पोलिसांनी लाच मागताच टॅक्सी ड्रायव्हरनं काय केलं पाहा; VIDEO व्हायरल
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
recalibration of taxi and rickshaw meters in mumbai is delayed causing fare disputes
रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनचा प्रश्न सुटेना
Virat Kohli Hugged by Female Fan on Airport Video Viral as Team India
IND vs ENG: विराट कोहलीला महिला चाहतीने मारली मिठी, एअरपोर्टवरील VIDEO होतोय व्हायरल
a woman caught red-handed in delhi metro while Pick-Pocketing
Video : दिल्ली मेट्रोत पाकीट मारताना तरुणीला पकडले रंगेहाथ; पाहा, पुढे काय घडले? Video होतोय व्हायरल
News About Rapido
Rapido : “तू खूप सुंदर आहेस, मी तुला…”, रॅपिडो ड्रायव्हरने मेसेज आणि कॉल करत केला मानसिक छळ, महिलेची पोस्ट व्हायरल
Mumbai western expressway loksatta news
मुंबई : दुभाजक ओलांडून कारची बसला धडक; पश्चिम द्रुतगतीमार्गावर अपघात, कार चालकाचा मृत्यू
pune metro
पुणेकरांचा नादखुळा! पुणे मेट्रोतून प्रवास करताना तरुणांनी केले असे काही, Viral Video पाहून पोटधरून हसाल

अशाप्रकारे टॅक्सी चालक प्रवाशांची आर्थिक फसवणूक करत त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळत होता, असा आरोप व्हिडीओतील व्यक्तीने केला आहे, तसेच त्याने संबंधित टॅक्सीचा नंबर देखील व्हिडीओमध्ये दाखवला, यावेळी टॅक्सी चालक मात्र असा कोणताही प्रकार होत नसल्याचे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न करत होता. मी असं काही केलं नाही असं टॅक्सीचालक प्रवाशाला सांगताना दिसतोय.

टॅक्सी चालकाकडून होणाऱ्या फसवणुकीचा हा व्हिडीओ aamchi_mumbai‘s नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये फसणूक झालेल्या व्यक्तीने आपला अनुभव शेअर केल आहे. ज्यावर अनेक मुंबईकरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काही युजर्सनी व्हिडीओवर संताप व्यक्त करत टॅक्सी चालकावर कारवाईची मागणी केली आहे.

Story img Loader