Mumbai Taxi Meter Fraud Viral Video: मुंबईत टॅक्सीने प्रवास करताना टॅक्सीचालकाकडून प्रवाशांची लूट झाल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. जवळचे भाडे नाकारणे, मुख्य रस्त्यावरच सोडणे, जवळचा रस्ता असताना जाणूनबुजून वळसा मारुन नेणे असे अनेक प्रकार टॅक्सीकांकडून घडतात. त्याचबरोबर मीटर न वापरता मनमानी भाडे आकारणे आणि मीटरमध्ये छेडछाड करण्याचेही प्रकार अनेकदा समोर येतात. असाच धक्कादायक प्रकार मुंबईतील एका टॅक्सीचालकाकडून सुरु होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होच आहे. यात एक टॅक्सी चालक मीटरमध्ये छेडछाड करुन प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप एका प्रवाशाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबईतील असून तो प्रवाश्याबरोबर असलेल्या सहप्रवाश्याने शूट केला आहे. या व्हिडीओमधील प्रवाश्याने आरोप केला की, या टॅक्सी ड्रायव्हरने गिअरजवळ एक बटन बसवले आहे, हे बटण तो मध्येमध्ये दाबतो, बटण दाबल्यानंतर मीटरवरील आकडा वाढतो, अशाप्रकारे मीटरा आकडा वाढवून ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेतले जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai taxi meter fraud viral video man travelling in mumbai records video of scammed autorickshaw meter sjr