Mumbai Teen Cuts Birthday Cakes With Sword : हल्ली बर्थ डेच्या दिवशी तलवारीने केक कापण्याचा ट्रेंड सुरू आहे. याला फॉलो करत एका १९ वर्षीय बर्थ डे बॉयने सुद्दा तलवारीने केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला. मात्र तलवारीने केक कापणं हे या बर्थडे बॉयच्या चांगलंच अंगलट आलं आहे. तलवारीने केक कटिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. त्यानंतर या बर्थ डेवर पोलिसांनी कारवाई करत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे या बर्थ डे बॉयला पोलिस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागणार, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा टेबलावर ठेवलेले २१ केक धारदार तलवारीने कापत आहे. तसंच बाजूला त्याचे मित्र त्याचं बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसत आहेत. तरुणानं हातात तलवार घेतली आणि समोर ठेवलेले तीन एक एकामागून एक कापले. तलवारीनं केक कापण्याचा हा प्रकार त्याला भलताच महागात पडला आहे. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याला हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला आहे. तलारीने केक कापण्याच्या नादात त्याला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या लागणार असल्याने भविष्यात तो अशी चूक करताना शंभरदा विचार करेल, हे मात्र नक्की.
आणखी वाचा : या प्रेमाला कसलीच तोड नाही! आजी-आजोबांच्या जोडप्याचा हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : भाची हरवल्याची तक्रार करणाऱ्याला इन्स्पेक्टरने चपराक मारली, आता बदली झाली
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मुंबईतील बोरीवली भागातील आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी १९ वर्षीय मुलाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तलवार वापरणे बेकायदेशीर आहे. हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शुक्रवारी १६ सप्टेंबरच्या रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यानचा आहे. तलवार काढून त्याने केक कापण्याचा हा प्रकार अनेकांची उत्कंठा वाढवणारा आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. त्यामुळे बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर एका पत्रकाराने मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करणारा व्हिडीओ शेअर केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत हा प्रकार करणाऱ्या तरुणांचा शोध सुरू केला.
आणखी वाचा : Taiwan Earthquake: भूकंपाचा कहर, ट्रेनही अगदी खेळण्यासारखी पटरीवर हादरली, पाहा VIRAL VIDEO
तलवार बाळगणे आणि रस्त्यावर ती परजणे या गोष्टी गुन्हा आहेत. तलवार काढून केक कापल्यामुळे अनेकांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करत, त्यावर आक्षेप घेतला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.