Mumbai Viral Video : वाहतूक नियमांचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वाहतूक नियम हे नागरिकांच्या हिताच्या उद्देशाने बनवलेले आहे. या नियमांमुळेच नागरिक सुरक्षित प्रवास करू शकतात. वाहतूक कायद्यांची अंबलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर असते. वाहतून नियमांचे उल्लंघन होऊ नये, याची ते नेहमी काळजी घेतात पण तुम्ही कधी वाहतूक पोलिसाने नियमांचे उल्लंघन केल्याचे पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वाहतूक पोलिस चुकीच्या दिशेने दुचाकी चालवताना कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला वांद्रे पुलावरून चुकीच्या दिशेने वाहतूक पोलीस दुचाकी चालवताना दिसत आहे. या पुलावरून जाणाऱ्या एका कारच्या डॅश कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
MNCDFbombay या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका व्यक्तीने त्याच्या कारच्या डॅशकॅमेरात दोन घटना कैद केल्या, एक म्हणजे वाहतूक पोलीस वांद्रे पुलावरून चुकीच्या दिशेने दुचाकी चालवताना दिसत आहे तर दुसरी म्हणजे दुसरा वाहतूक पोलिस चुकीच्या बाजून यू टर्न घेतो. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचा आम्ही आदर करतो पण प्रत्येक जण सुरक्षेच्या कायद्याचे पालन करू या आणि पोलिस अधिकारी वाहन नियमांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार नाही, याची काळजी घेऊ या. आम्ही याद्वारे विनंती करतो की @CPMumbaiPolice शहर पोलीस दलाला निर्देश जारी करावे.”
वरील कॅप्शनमध्ये दुसऱ्या वाहतूक पोलीसाने वाहतूक नियमाचे उल्लघन केल्याचा आरोप केला आहे पण या व्हिडीओमध्ये दुसरा वाहतूक पोलिस यू टर्न घेताना स्पष्टपणे दिसत नाही.
हेही वाचा : Pune : पुण्यातील बर्ड व्हॅली उद्यानातील सुंदर लेझर शो पाहिला का? व्हिडीओ होतोय व्हायरल
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पोलिस स्वतःनियम मोडतात आणि त्यांनी सुद्धा अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “सर्व गाड्यांसाठी डॅशकॅम अनिवार्य केले पाहिजे.रेकॉर्ड होत असल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होईल आणि कोणीही वाहतूक नियम मोडणार नाही.अपघाताच्या प्रकरणांमध्ये डॅश कॅमेरा पुरावा म्हणून कामी येऊ शकतो. तर काही युजर्सनी लिहिलेय, ” वाहतूक पोलिस त्यांच्या कामानिमित्त चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत असेल.”