Mumbai Car And Bike Live Accident Video : रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. प्रत्येक चालकाने या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, तर अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. दरम्यान, मुंबईत वाहन चालवणे तसे जिकिरीचेच काम आहे. एकीकडे ट्रॅफिक; तर दुसरीकडे पादचाऱ्यांची गर्दी आणि त्यातूनही जर एखादा रस्ता मोकळा दिसला की, वाहनचालक नियमांना बगल देत सुसाट गाडी पळवत नेतात. पण, असे करणे चालकाच्या आणि इतरांच्याही जीवावर बेतणारे ठरू शकते. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवताना केलेली एक चूक किती महागात पडू शकते याची जाणीव होईल. या व्हिडीओवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका ट्रॅफिक सिग्नलजवळील आहे; ज्यात चुकीच्या बाजूने येणारा बाइकस्वार सिग्नलजवळ पोहोचताच वळण घेतो आणि थेट भरधाव वेगाने येणाऱ्या कारला जाऊन धडकतो. त्यात बाइकस्वार बाइकसह थोड्या अंतरावर जाऊन जोरात कोसळतो; ज्यात त्याच्या बाइकचे खूप नुकसान होते. दरम्यान, व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी चूक दोघांचीही असल्याचे दिसतेय. कारण- बाइकस्वार चुकीच्या दिशेने आला आणि त्याने सिग्नल चालू असतानाही वळण घेतले. तसेच दुसरीकडे कारचालकही ग्रीन सिग्नल नसतानाही भरधाव वेगाने कार पळवत होता. त्यामुळे दोघांच्याही चुकांमुळे हा अपघात झाल्याचे म्हटले जातेय.

two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Road Accident van hit scooter smashed into pieces video viral on social media
चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप
Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
Shocking video : A rickshaw caught fire due to firecrackers
धक्कादायक! फटाक्यामुळे धावत्या रिक्षाला लागली भररस्त्यात आग, संभाजीनगरचा VIDEO होतोय व्हायरल

@RoadsOfMumbai नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण- कारचालकाने सिग्नल तोडला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तर, काही लोकांनी चुकीच्या बाजूने बाइक चालवल्यामुळे बाइकस्वाराची चूक असल्याचे म्हटले आहे.

जगातील सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील ‘या’ भाजीचा समावेश; तुम्हाला आवडते का ही भाजी?

पाहा अपघाताचा लाइव्ह व्हिडीओ

काय म्हणाले मुंबई वाहतूक पोलीस

हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, त्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर ट्विट करीत लिहिले की, पुढील कारवाई करण्यासाठी तुम्ही अपघाताच्या ठिकाणाची सविस्तर माहिती द्या.