मुंबईमध्ये बुधवारी झालेल्या जोरदार पावसानंतर ‘ताश्कंद फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये रस्त्यावरील एक सिग्नल साठलेल्या पाण्यातून वाहून जाताना दिसत होता. ‘नमस्कार, मुंबईचे वाहतूक पोलीस मला सांगू शकतील का जर सिग्नलने रोड ओलांडला तर त्याला किती दंड करण्यात येतो?,’ अशी कॅप्शन त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करताना वापरली होती. मात्र खरच हा व्हिडिओ मुंबईतील आहे का याबद्दलची चर्चा नेटवर सुरु झाली आणि या व्हिडिओची खरी कथा समोर आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अग्निहोत्री यांनी फेसबुक आणि ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या या व्हिडिओला ३० हजारहून अधिक व्ह्यूज आहेत. तर २ हजार ९०० हून अधिक जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

अग्निहोत्रीच नाही तर फेसबुकवर अनेक पेजेसने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारोच्या संख्येने शेअर्स आणि लाइक्स मिळाले आहेत.

व्हिडिओ खरच मुंबईचा आहे का?

हा व्हिडिओ खरचं मुंबईचा आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. हा व्हिडिओ मागील वर्षीही काही पेजेसने मुंबईचा व्हिडिओ म्हणून शेअर केला होता. खाली पाहा एका वर्षापूर्वी म्हणजेच ११ जून २०१८ रोजी शेअर केलेली ही पोस्ट

व्हिडिओ कुठला?

या व्हिडिओसंदर्भात गुगलवर ‘Traffic Signal Water’ किंवा ‘Traffic Signal Flotting on Water’ असं सर्च मारल्यास अनेक व्हिडिओ सापडतात. विशेष म्हणजे यापैकी बरेचसे व्हिडिओ हे मागील वर्षातील आहे. मुंबईत ४ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसातील व्हिडिओ या नावाने सध्या व्हायरल होणारा व्हिडिओही जुनाच असल्याचे स्पष्ट होत असून हा व्हिडिओ चीनमधील असल्याचे दिसत आहे. चीनमधील सीजीएनटी या वृत्तवाहिनीने युट्यूबवर ११ मे २०१८ रोजी हा व्हिडिओ सर्वात आधी पोस्ट केल्याचे दिसते. दक्षिण चीनमधील युलीन शहरामध्ये पूर आल्यानंतर तेथे तात्पुरत्या स्वरुपात लावण्यात आलेला सिग्नल वाहून जाताना या व्हिडिओत दिसत आहे. सध्या व्हायरल होणारा आठ सेकंदाचा व्हिडिओ हा याच व्हिडिओ क्लिपमधील तुकडा आहे.

चीनमधला असल्याचा पुरावा काय?

मुंबईतील व्हिडिओ म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडिओ नीट पाहिल्यास अनेक अक्षरे ही चीनी लिपीतील असल्याचे दिसते. यामध्ये दुकानांवरील नावे, गाड्यांच्या नंबर प्लेट चीनी लिपीत असल्याचे दिसून येते. हा सिग्नल त्याच्यावर बसवण्यात आलेल्या सोलार पॅनलवर काम करत असल्याने वाहून जात असतानाही त्याच्या लाईट्स काम करताना दिसत आहे.

दरम्यान याआधीही अग्निहोत्री यांनी अशाप्रकारचे चुकीची माहिती देणारे व्हिडिओ पोस्ट केल्याची उदाहरणे आहेत. त्यांनी नंतर हे ट्विट डिलीट केले.