Chinchpokli Cha Chintamani 2023 First Look: गणेश चतुर्थीचा सण अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी आज चिंचपोकळीच्या चिंतामणी चे आगमन झाले आहे. भाविकांना आज गणेशमूर्तीचं पहिलं दर्शन देखील झालं आहे. दक्षिण मुंबई मध्ये भाविकांनी गाजत वाजत मूर्तीच्या आगमन सोहळ्यात सहभाग नोंदवल्याचं पहायला मिळालं आहे.
दरम्यान चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज दक्षिण मुंबई भागात वाहतूकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती ट्राफिक पोलिस विभागाने दिली आहे. दुपारी २ वाजल्यापासून ही मिरवणूक संपेपर्यंत हे बदल लागू असणार आहेत. यामध्ये काही मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे अशी माहिती ट्राफिक विभागाने दिली आहे.
चिंतामणी गणपतीच्या आगमनासाठी मुंबईतील वाहतुक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या
- दि.०९/०९/२०२३ रोजी १४:०० वाजल्यापासून आवश्यकतेनुसार खालील मार्ग बंद करण्यात येतील.
- डॉ. बी. ए. रोड, दक्षिण वाहिणी कॉग्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) ते हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शन)
- डॉ. बी. ए. रोड, उत्तर वाहिणी- हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शनपर्यंत) ते कॉग्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन)
- साने गुरुजी मार्ग – कॉम्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन)- ते संत जगनाडे महाराज चौक (गॅस कंपनी)
पर्यायी मार्ग
- डॉ. बी. ए. रोड, दक्षिण वाहिणीवरून सीएसएमटीकडे जाणारी वाहने कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) येथे उजवे वळण घेवुन करी रोड ब्रिज-शिंगटे मास्तर चौक- डावे वळण एन. एम. जोशी मार्ग – कॉग्रेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) – अब्दुल हमिद अन्सारी चौक (खडा पारसी) येथुन दक्षिण मुंबईकडे जातील.
- डॉ. बी. ए. रोड, उत्तर वाहिणीवरून दादरकडे जाणारी वाहने हंसराज राठोड चौक (बावला कंपाऊंड जंक्शन) येथे उजवे वळन घेवुन – टि बी कदम मार्ग-उजवे वळण दत्ताराम लाड मार्ग- श्रावण दादा यशवंते चौक- डावे वळण
- जी. डी. आंबेकर मार्ग- डावे वळण साईबाबा पथ- कॉग्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) उजवे वळण घेवुन दादरकडे जातील.
- साने गुरुजी मार्ग, कॉमेड गणाचार्य जंक्शन (चिंचपोकळी जंक्शन) येथुन दादरकडे जाणारी वाहने सरळ एन. एम. जोशी रोडने शिंगटे मास्तर चौक-उजवे वळण करी रोड ब्रिज कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) उजवे वळण घेवुन इच्छित स्थळी जातील.
चिंतामणीचा फर्स्ट लूक
गणेशोत्सव मुंबई शहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी चोख उपाययोजना केलेल्या आहेत. दरम्यान चिंतामणी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
हेही वाचा >> Chintamani First Look 2023: चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा फर्स्ट लूक आला समोर; बाप्पाचं देखणं रूप पाहतच राहाल
- दक्षिण मुंबई मध्ये भाविकांसाठी आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन त्यांना १९ सप्टेंबर पासून पुढील १० दिवस घेता येणार आहे.
गणेशोत्सव मुंबई शहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी चोख उपाययोजना केलेल्या आहेत. दरम्यान चिंतामणी गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.