Vadapav Got Featured: अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो.आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. याच वडापावच्या शिरपेचात मोठा मानाचा तुरा रोवणारी बातमी सध्या समोर येत आहे. टेस्टऍटलास या वेबसाईटने अलीकडेच जगभरातील ५० बेस्ट सँडविचची यादी प्रकाशित केली होती. यामध्ये केवळ दोन शाकाहारी सँडविचचा समावेश आहे. ज्यातील एक आहे अवाकाडो टोस्ट आणि दुसरा म्हणजे आपला लाडका वडापाव. वडापावचा जन्म ते शिवसेनेच्या साथीने दिलेला अस्तित्वाचा लढा इथपासून प्रवास करत आज वडापाव जगात भारी ठरला आहे. हा प्रवास नेमका कसा होता हे पाहुयात..

वडापावचा जन्म व इतिहास

वडापावचा जन्म 1966 साली दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर झाला. याच दरम्यान, दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरुवात केली. फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्याऐवजी भाजीचा गोळा बेसनात घोळवून तळून त्याचा बटाटावडा बनवण्यात आला, आणि चपातीला पर्याय म्हणून पाव वापरण्यात आले. याच पावात चटकदार चटणी, खास लसणाची सुकी चटणी, बेसनाचा चुरा असे टाकून देण्यात येऊ लागले. याच गरज वजा प्रयोगातून वडापावची इतक्या वर्षांची यशस्वी परंपरा मुंबईला लाभली.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज

हे ही वाचा << खरवस, बर्फीसारखं घट्ट दही घरी बनवा; विरजणाची गरजच नाही; ‘ही’ रेसिपी आहेच भारी

वडापाव आणि मराठी माणूस..

मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील गिरणी कामगार व वडापाव असाही एक खास संबंध आहे. १९७० ते १९८० च्या काळात मुंबईमध्ये गिरण्या बंद पडल्यावर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या. जेव्हा शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले.तेव्हा अनेक ठिकाणी मराठी माणसाचा मान म्हणून वडापावच्या विक्रीत भर पडत गेला. मध्यंतरी शिवसेनेनेही ‘शिव वडापाव’ची सुरुवात केली होती.