Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात, तर कधी कोणी डान्स करताना दिसतात. कधी कोणी अनोखा जुगाड सांगताना दिसतात तर कधी कोणी आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर करतात. (a legendary Marathi poet mangesh padgaonkars famous poem sanga kss jagaych lines on the wall of washi mumbai inspiring mumbaikars video goes viral)

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या रस्त्यावरील आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या एका बाजूला भिंतीवर ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक मंगेश पाडगावकरांच्या एका प्रसिद्ध कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत. या ओळी वाचून तुम्हीही थक्क व्हाल आणि तुम्हाला जगण्याची प्रेरणा मिळू शकते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

हेही वाचा : Coldplay Ticket : मुंबई सोडा, एवढ्या पैशात तर थेट अबू धाबीला जाऊन कोल्डप्लेचा शो पाहून याल! ३ लाखांच्या तिकिटाची चर्चा!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला चौकात रस्त्याच्या एका बाजूला भिंतीवर मोठ्या अक्षरात पाडगावकरांच्या प्रसिद्ध कवितेच्या ओळी लिहिलेल्या दिसेल. या भिंतीवर लिहिलेय,
“सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत
की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!”

-मंगेश पाडगावकर

या चौकात सिग्नलवर थांबलेल्या लोकांची नजर आपोआप या भिंतीकडे जाते. एका जणाने याचा व्हिडीओ शूट केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओवर लिहिलेय, “आज वाचलेली सुंदर ओळ” हा व्हिडीओ वाशी, नवी मुंबईचा आहे.

पाहा व्हिडीओ

marathi_manus_pradip या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जगायचं गाणं म्हणतं… हे जीवन पुन्हा नाही.”

हेही वाचा : पार्किंगमध्ये कार शोधण्यात तुमचाही खूप वेळ जातोय? मग एलन मस्क यांनी पोस्ट केलेला Video एकदा पाहाच; क्षणात कार समोर येऊन उभी

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा !”
तर एका युजरने या जागेविषयी माहिती सांगताना लिहिलेय, “वाशी नवी मुंबई, अरेंजा कॉर्नर” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपली वाशी” एक युजर लिहितो, “हा आमचा महाराष्ट्र”