Dadar railway station: मुंबई शहरातील सर्वात गजबजलेले आणि गर्दी असणारं स्टेशन अशी दादर रेल्वे स्थानकाची ओखळ आहे. कोणत्याही वेळेला दादर रेल्वे स्थानकावर गर्दी पहायला मिळते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे २४ तास पोलिस तैनात असतात. आता मात्र, या गर्दीवर कायस्वरुपी तोगडा मात्र निघत नाही. याच गर्दीचा फायदा घेत चोर हातसफाइ करतात, याचाच फटका रोज हजारो पर्यटकांना बसतो. सध्या सोशल मीडियावर दादर स्टेशनवरील असाच एका चोराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढल्या आहेत. चोर रेल्वे स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चक्क एक लहान मुलगा चोरी करण्याच्या तयारीत दिसत आहे. रेल्वे स्टेशनवर प्रवासी उभे आहेत, ते ट्रेन येण्याची वाट बघत असताना, हा मुलगा सर्व प्रवाशांना निरखून पाहत आहे. जणू तो चोरी करायच्या पूर्वी स्रव गोष्टींचा अंदाज घेत आहे. यावेळी तो थोडासा पुढे जातो आणि चोरी करुन पळून जातो. व्हिडीओ काढणारी मुलगी नंतर ओरडतो तरी तो पळून जाण्यात यशस्वी होतो.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
tula shikvin changalach dhada akshara life in danger
अक्षराचा जीव धोक्यात; पत्नीला कसा वाचवणार अधिपती? फोनवर किंचाळण्याचा आवाज येताच घडतं असं काही…; पाहा प्रोमो
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: पोसणारा निसर्ग जेंव्हा कोपतो! हिमाचलमध्ये मानवाने केलेला कचरा निसर्गाने कसा परत केला पाहा

हा व्हिडीओ एका मुलीने काढला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नोटकरीही संतापले असून रोज अशा गोष्टींना सामोरे जावं लागत असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. दादर सारख्या गजबजलेल्या स्टेशवर चोरी करणं हे चोरांसाठी डाव्या हातचं काम झालं आहे. अनेकदा कारवाई करुनही या घटना कमी होताना दिसत नाहीत.