Car Catches Fire In Andheri: भरधाव कारचा अपघात होऊन आग लागल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील तेल्ली गल्लीमधील गोखले पुलावर कारला आग लागल्याची घटना घडली आहे. आग अद्याप आटोक्यात आली नसल्याने अंधेरीतील गोखले पूल आणि सहार परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गोखले पुलावर कारला भीषण आग

या घटनेचा व्हिडीओ मुंबई ट्रॅफिक पोलिस विभागाने एक्सवर पोस्ट करत “गाडीला लागलेल्या आगीमुळे गोखले ब्रिज, सहार येथे वाहतूक संथ आहे”, अशी माहिती दिली आहे. आगीची दृश्ये सोशल मीडियावर समोर आली आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आगीमुळे धुराचे दाट लोट उठताना दिसत होते. संपूर्ण कार जळाल्याने आजूबाजूच्या भागात धूरही पसरला होता.

पुलावरून वाहतूक संथ गतीने सुरू

आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू असून पुलावरून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. प्रवाशांना अंधेरी सबवे, कॅप्टन गोरे फ्लायओव्हर इर्ला यांसारखे पर्यायी मार्ग निवडण्याचे सुचविले आहे. गोखले पुलावरील दुर्घटनेमध्ये कुणी जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच आग कशामुळे लागली हेही शोधण्याचे काम अद्याप सुरू आहे. चालू गाडीमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना ऐकायला, पाहायला मिळतात. यात बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसल्याने, गाडी लॉक झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचं देखील समोर आलं आहे. जुन्याच नाही, तर नवीन गाडीतही आग लागण्याच्या अनेक घटना घडत असतात. आगीच्या घटनांना विविध घटक कारणीभूत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ बिबट्याची चलाख चाल अन् मगरीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

आग लागल्यानंतर गाडीचे दरवाजे आणि काचा पूर्णपणे लॉक होतात. त्यामुळे बाहेर पडता येत नाही. त्यासाठी गाडीमध्ये काही गोष्टी ठेवणे तुमच्या उपयोगी येऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून कारचा अपघात झाल्यास तुम्ही गाडीत अडकू नये.

‘या’ गोष्टी नेहमी कारमध्ये ठेवा

अनेकदा स्वस्तात काम कारण्यासाठी गॅरेजमधून काम करून घेतलं जातं, पण यात काही गडबड झाल्यास, गाडीमध्ये शॉर्टसर्किट होण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळे थोडे जास्त पैसे गेल्यास हरकत नाही. परंतु, गाडीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमधून सर्व्हिसिंग करून घेतल्यास सेवा चांगली मिळते आणि गाडी सुरक्षित असल्याची हमीदेखील मिळते.

हातोडा

अपघाताच्या वेळी अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्ही गाडीत नेहमी हातोडा ठेवावा, जेणेकरून दरवाजा लॉक असताना तुम्ही काचा फोडू शकता आणि शुद्ध हवा येऊन श्वास घेऊ शकता.