Mumbai Viral Video : सोमवारी देशभरात रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यातील गोडवा जपणारा सण असतो. बहीण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. असाच जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि काळजी एका व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये दोरीवर कसरत करणारी एक चिमुकली दिसते. ती हातात बांबू आणि डोक्यावर मडके घेऊन उंच बांधलेल्या दोरीवरुन चालताना दिसत आहे. ती अत्यंत आत्मविश्वासाने चालत आहे कारण तिचा भाऊ तोल सावरायला खाली उभा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांच्या डोळ्यात पाणी येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली दिसेल. हातात बांबू आणि डोक्यावर दोन छोटी मडके घेऊन उंच बांधलेल्या दोरीवरुन चालताना दिसत आहे. ती अत्यंत आत्मविश्वासाने चालताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की खाली तिचा भाऊ उभा आहे आणि त्याचे संपूर्ण लक्ष तिच्याकडे आहे. तिचा तोल सावरायला तो उभा आहे. पाठीराखा असलेला हा भाऊ पाहून कोणीही भावूक होईल. पोट भरण्यासाठी हे बहीण भाऊ हा खेळ लोकांना दाखवत आहे.
पुढे व्हिडीओत दोन चिमुकले भाऊ येतात आणि या खेळ दाखवणाऱ्या बहीण भावाला पैसे देतात. हा व्हिडीओ मुंबईच्या दादर परिसरातील आहे.

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video

हेही वाचा : मूर्ती लहान; पण कीर्ती महान! वाहतुकीचे धडे देणारं चिमुकल्याचं गाणं; चॉकलेट, कट-आउट दिले अन्… पाहा कौतुकास्पद VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

28dadar_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अनोखं रक्षाबंधन. आज एका अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन व तारेवरची कसरत अनुभवली.” या व्हिडीओवर एका तरुणाने व्हॉइस ओव्हर दिला आहे. तो म्हणतो, “आज खरं रक्षाबंधन आणि शब्दश: नाही तर प्रत्यक्ष तारेवरची कसरत अनुभवली. तुम्हाला माहितीये का ही मुलगी आत्मविश्वासावर अवलंबून आहे. म्हणून तिला तोल जाण्याची कधीच भीती वाटत नाही. कसरत जरी बहीण करत असली तरी भावाचा जीव कायम टांगणीला असतो. म्हणून पदोपदी एक सावली म्हणून त्या दोरीखाली उभा राहतो. या मंत्रमुग्ध करणाऱ्या खेळात अचानक दोन चिमुरडे येतात आणि ताटात मदत म्हणून काही फुल नाही पण फुलाची पाकळी टाकून जातात, तेव्हा खरं गहिवरुन येतं”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तोल सावरायला तिचा भाऊ उभा” तर एका युजरने लिहिलेय, “नाही मनात कसल्या ही प्रकारचे स्वार्थ,करायचे तर फक्त दोन वेळच्या भाकरीसाठी…..” आणखी एका युजरने लिहिलेय, “हृदयाला लागणारी गोष्ट बोललात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आपली मते व्यक्त केली आहेत.