Viral Video : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहिल्यानंतर जगण्यास प्रेरणा मिळते. हे व्हिडीओ फक्त आपल्याला धैर्य, ऊर्जा आणि प्रेरणा देत नाही तर त्याबरोबर जगण्यास बळ देते सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने दिव्यांग डिलिव्हरी बॉयशी संवाद साधला आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांच्या अंगावर काटा येईल तर काही लोक हा व्हिडीओ पाहून थक्क होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण सांगतो की मुंबईच्या रस्त्यावर मी एका प्रेरणादायी डिलिव्हरी बॉयला पाहिले. या तरुणाने या डिलिव्हरी बॉयबरोबर संवाद साधला.
तरुण – नाव काय तुझं?
डिलिव्हरी बॉय – पवन विलास जाधव
तरुण – किती वर्षाचा आहे.
डिलिव्हरी बॉय – ३१ वर्षाचा आहे
तरुण – घरी कोण कोण असतं
डिलिव्हरी बॉय – आई, वडिल आणि भाऊ
तरुण – तुझ्या पायांना काय झालं?
डिलिव्हरी बॉय – २०१२ मध्ये बसचा अपघात झाला. त्याच्यात माझी स्पाइन डॅमेज झाली आणि त्याच्याने मला अपंगत्व आलं.
तरुण – या आधी तु काय काय ट्राय केलं.
डिलिव्हरी बॉय – छोटेमोठे व्यवसाय गावी करत होतो. त्यामध्ये पण नुकसान यायचं
तरुण – आईवैगरे काय नोकरी करतात?
डिलिव्हरी बॉय – आई ही केअर टेकरचं काम करते. भाऊ पण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.
तरुण – जेव्हा तुझा अपघात झाला तेव्हा काय काय गोष्टी बदलल्या तुझ्या आयुष्यात?
डिलिव्हरी बॉय – चालणारा आनंदी मुलगा होतो तो डायरेक्ट बेडवर येऊन बसलो. त्यानंतर चालणं हे मी विसरूनच गेलो. काहीतरी स्वत:साठी बनायचं आणि अपंग सुद्धा कमवू शकतो, हे दाखवायचं आहे. घरच्यांना पण आपल्याकडून थोडीशी मदत व्हायला पाहिजे. एक महिना झाला, झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम चालू केलं.
तरुण- खर्च किती यायचा तुला?
डिलिव्हरी बॉय – याआधी ६५ लाख रुपये कर्ज झाले आमच्यावर
तरुण – तुझ्या या गाडीचा काय प्रॉब्लेम आहे?
डिलिव्हरी बॉय – या गाडीसाठी मला बॅटरी बॅकअप कमी पडतो. या गाडीला आणखी एखादी बॅटरी आली ना तर आता मी जे १५०० रुपये कमावतो. ते माझं टार्गेट ३००० रुपयांवर होईल
तरुण – आईचा सपोर्ट कसा होता तुला, जेव्हा हे झालं तेव्हा?
डिलिव्हरी बॉय – आईने तर मला माझं अंपगत्व कधीही आठवून दिलं नाही. मला कुठे जायचं असेल तर ती स्वत: उचलून नेणं
तरुण – अशी कोणती एक गोष्ट आहे, जे तुझं आयुष्य बदलू शकते?
डिलिव्हरी बॉय – झोमॅटो माझं आयुष्य बदलू शकते
तरुण – तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. तू आधीच स्टार परफॉर्मर आहे.
हा संवाद ऐकून कोणीही थक्क होईल. या डिलिव्हरी बॉयला पाहून तुम्हाला संघर्ष काय असतो, हे कळेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
sidiously_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्या तरुणाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी एका प्रेरणादायी डिलिव्हरी बॉयला भेटलो जो अपंग आहे पण त्याची जिद्द व चिकाटीचे हाडे अजुनही मजबूत आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सलाम तुझ्या जिद्दीला” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात प्रबळ इच्छाशक्ती” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.