Viral Video: मुंबईत फिरण्यासाठी बस, रेल्वे, ओला, उबर आदी अनेक पर्याय प्रवाशांसाठी आहेत. पण, रेल्वे हा मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण हा प्रवास सोयीस्कर आणि कमी खर्चिक आहे. रेल्वेतून अनेक वस्तूंची ये-जा सुद्धा सहज करता येते. पण, त्याला काही मर्यादा सुद्धा आहेत. तर आज ‘मुंबई सेंट्रल’ रेल्वे स्थानकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यामध्ये अगदी चुकीच्या पद्धतीने, धावत्या ट्रेनमधून चेरीचे पॅकबंद बॉक्स स्टेशनवर फेकले जात आहेत. नक्की काय घडलं जाणून घेऊ.

व्हायरल व्हिडीओ मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा आहे. २५ जून रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून ट्रेन निघाली आणि काही वेळातच धावत्या रेल्वेतून मधून चेरी ठेवलेले पॅकबंद बॉक्स रेल्वे स्थानकावर फेकून देण्यात आले आहेत. हे बॉक्स बेपर्वाईने कसे हाताळले जात आहेत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कशाप्रकारे धावत्या रेल्वेतून चेरीचे पॅकबंद बॉक्स फेकले जात आहेत व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…आजोबांची लाडक्या साथीदाराला गाडीत चढण्यास मदत; VIDEO तील ‘ती’ एक गोष्ट पाहून म्हणाल ‘असा एक मित्र…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हयरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रेल्वे स्थानकावर उपस्थित एका अज्ञात नागरिकाने हा व्हिडीओ शूट केला आहे. कारण – चालत्या ट्रेनमधून चेरीचे पॅकबंद बॉक्स ऑन ड्युटी पोलिसांच्या उपस्थितीत स्टेशनवर फेकले जात आहेत. स्टेशनवर हे बॉक्स फेकल्यामुळे चेरीचे नुकसान होऊ शकते असे पोस्ट शेअर करणाऱ्याने चिंता व्यक्त केली आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mumbaimatterz या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे ; जो अनेक नेटकऱ्यांनी सुद्धा रिपोस्ट केला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देत या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई सेंट्रल, पश्चिम रेल्वे विभागाने त्यांच्या @drmbct एक्स (ट्विटर) अकाउंटवरून कमेंट करत लिहिले की, ‘चेरीचे बॉक्स मोठ्या प्रमाणात होते. ट्रेनमध्ये दहा ते पंधरा डब्बे शिल्लक राहिले होते आणि ट्रेन यार्डसाठी मागे खेचली गेली आणि उर्वरित नाशवंत चेरीचे पॅकबंद बॉक्स धावत्या ट्रेनमधून उतरवण्यात आले. मात्र, व्हिडीओत दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे आणि त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल ; असे यात लिहिलं आहे.