Mumbai Marine Drive Video : मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. दरदिवशी हजारो लोक मुंबई दर्शनासाठी येतात. या शहरात येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई हवीहवीशी वाटते. येथील काही ठिकाणे या शहराची आगळी वेगळी ओळख सांगतात. गेटवे ऑफ इंडिया, चौपाटी आणि जुहू बीच, सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली, मरीन ड्राईव्ह इत्यादी ठिकाणांवर लोकांची खूप गर्दी दिसून येते. या सर्व ठिकाणांपैकी सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्हला लोकांची भयंकर गर्दी असते. तुम्हाला कधी प्रश्न पडला का की मरीन ड्राईव्हला एवढी गर्दी का असते? लोक मरीन ड्राईव्हलाच का येतात? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळेन.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण तरुणी मरीन ड्राईव्हला फिरायला जातात. तेव्हा त्यांना मरीन ड्राईव्हला भयंकर गर्दी दिसते. ही गर्दी पाहून ते एक व्हिडीओ शेअर करतात आणि मरीन ड्राईव्ह इतके खास का आहे, हे सांगतात.

हेही वाचा : Pune Video : पुण्यातील १३५ वर्ष जुन्या वाड्यातील वडापाव खाल्ला का? एकदा VIDEO पाहाच

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक तरुणी सांगते, “मित्रांनो, आज आम्ही मरीन ड्राईव्हला आलो आहोत. मला तुम्हाला मोठा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर प्रत्येकाला विचारायचा आहे की मरीन ड्राईव्हला प्रत्येक वीकेंडला एवढी गर्दी का असते? मुंबईत अनेक वेगवेगळी ठिकाणे बघण्यासारखी आहेत पण तरीसुद्धा लोक मरीन ड्राईव्हलाच का येतात?”
पुढे या व्हिडीओत एक तरुण उत्तर देतो, “कसं आहे ना तु जर मरीन ड्राईव्हला आली तर तुला वेगवेगळ्या प्रकारची लोक दिसतील. कोणाचं ब्रेकअप झालेलं असतं. कोणाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असतो, कोणाच्या घराचा इएमआय थकला, कोणाच्या पेटचा बर्थडे, कोणी स्कुल बंक करून आले, कोणी ट्युशन बंक करून आले किंवा कोणाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरपण असू शकतं. हे सगळे मरीन ड्राइव्हला येतात आणि समुद्र आहे मरीन ड्राईव्हचा हे सगळे सारे इमोशन आपल्या पाकिटमध्ये टाकतो आणि आपल्याला शांतता देतो किंवा आनंद देतो किंवा जे काही असेल. जर एखादी व्यक्ती आनंदी नसेल आणि ती व्यक्ती जेव्हा मरीन ड्राईव्हला येऊन बसते, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद झकळतोच. त्यामुळे मरीन ड्राइव्ह हा खूप खास आहे.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘धिना धिन धा’ बापलेकीने केला भन्नाट डान्स, इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO, एकदा पाहाच

shesa_vlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “मरीन ड्राईव्ह इतके खास का?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मॅडम तुमच्या गळ्यात जो मोत्याचा हार आहे ना तो जसा सुंदर दिसतोय, तसाच हा मुंबईचा “क्वीन्स नेकलेस” आहे. आम्ही गिरगावात राहतो. आमच्या सुख दुःखात मरीन ड्राईव्हच महत्व अनन्यसाधारण आहे. लहानपणी ह्या मारिन ड्राईव्हला आई बाबां बरोबर फेरी मारायला किंवा बाबांबरोबर सायकल वरून फेरी मारायला , मग शाळेतल्या मित्र मैत्रिणींबरोबर फिरायला, मग कॉलेज मधल्या मित्रमैत्रिणींबरोबर टाइमपास करायला, मग गर्लफ्रेंड बरोबर प्रेमाचे सुंदर क्षण अनुभवायला, मग गर्लफ्रेंड ची बायको झाल्यावर पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवायला, मग बाबांचा रोल स्वतः निभावायला म्हणजेच मुलांना फिरवायला ,आता ५० शी मध्ये, गेल्या ५० वर्षात ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या आठवायला आम्ही मारीने ड्राईव्हला जातो, म्हातारपणी सुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर इथेच वेळ व्यतीत करावा असा हा सुंदर मरीन ड्राईव्ह आपल्याला जगण्याची एक उमेद देतो. तुमचे फार फार धन्यवाद पुन्हा एकदा आम्हाला सगळं आठवून दिल्या बद्दल.”

एक युजर लिहितो, “शांत निराळ्या समुद्राकडे बघून सगळं मनातलं वादळ शांत होत म्हणून मरीन ड्राईव्ह ला येतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “समुद्र स्वतःमध्ये सगळं सामावून घेतो आणि पांढऱ्या शुभ्र असलेल्या लाटा बाहेर फेकतो, आपलं ही तेच आहे, सगळं काही सामावून घ्यावं लागतं आणि मरिन ड्राईव्हचा समुद्र तेच शिकवतो आपल्याला, तो आपल्याला आपला वाटतो. ” अनेक मुंबईकरांनी त्यांना मरीन ड्राईव्ह का खास वाटतो, हे कमेंट्मध्ये सांगितले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai video why is marine drive so special for mumbaikars why people go to only marine drive video goes viral ndj