दारूच्या नशेत कोण कधी काय करील ते सांगता येत नाही. अनेकदा नशेबाज काय वागतात याचे त्यांना भान नसते. ते कधी कोणावरही हल्ला करतात, शिवीगाळ करतात. अशा वेळी ते अनेकदा स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. आपण काय वागतोय याची त्यांना काही पर्वा नसते. नशेत असताना त्यांचा आत्मविश्वास नको इतका वाढतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मद्यपी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात तो चक्क पोलिसांबरोबरच ‘पंगा’ घेताना दिसतोय. हा मद्यपी भररस्त्यात पोलिसांच्या गाडीवर चढतो आणि त्यानंतर तो असा काही धिंगाणा घालतो, जो पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांची गर्दी जमा होते.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मद्यपी तरुण पोलिसांच्या गाडीवर चढतो. भररस्त्यात उभ्या असलेल्या त्या गाडीवर चढून तो गोंधळ घालण्यास सुरुवात करतो. त्यानंतर दोन पोलिस त्याला उतरवण्यासाठी गाडीजवळ धावत येतात आणि गाडीच्या टपावर चढून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करतात. पण, तरीही तो मद्यपी गाडीवरून खाली उतरण्यास तयार नसतो. यावेळी पोलीस मद्यपीचा पाय पकडून त्याला खाली आणत असतात; मात्र तो पोलिसांना लाथेने मारण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पोलीस त्याला ज्या काठीने मारण्याचा प्रयत्न करतात, तीच काठी ताब्यात घेऊन, तो ती फेकून देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे पोलिसांनाही त्याला आवरणे अवघड होते.

youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Traffic police beaten, drunk youth, Pune,
पुणे : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, हडपसर भागातील घटना
police detained criminal and beat him on street who threatened to beat journalists
Video : डोंबिवलीत दहशत माजविणाऱ्या भाईला भर रस्त्यात पोलिसांचा चोप
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
Mumbai Suburb, Mumbai Suburb Nature, Congestion ,
शांत काळोखाचे तुकडे
Policeman killed in Navi Mumbai crime news
नवी मुंबईत पोलिसाची हत्या, मृतदेह ट्रॅकवर फेकला..

मद्यधुंद तरुणाला पोलिसांच्या गाडीवर चढून धिंगाणा

ही घटना मुंबईच्या अंधेरी परिसरातील असल्फा परिसरात घडली आहे. पोलीस त्याला कसेबसे त्याला सावरतात आणि गाडीवरून खाली उतरवतात. पण, या घटनेमुळे रस्त्यात खूपच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी लोकांचीही बरीच गर्दी झाली होती. पण, काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच त्यांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

Story img Loader