Mumbai Crime News: वांद्रे वरळी सी-लिंकवर दुचाकीला परवानगी नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे, दरम्यान वांद्रे वरळी सी-लिंकवर जॉयराईडसाठी मोटरसायकल घेऊन जाणाऱ्या मध्य प्रदेशातील महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका वाहतूक पोलिसानं वांद्रे वरळी सी-लिंकवरुन जाण्यास महिलेला रोखलं, त्यानंतर महिलेमध्ये आणि वाहतूक पोलिसांत शाब्दिक चकमक झाली अन् महिलेनं थेट एक गन काढून पोलिसाला धमकावलं. यावेळी शिवीगाळ, धमक्या तिने पोलिसांना दिल्या असून हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

महिला वरळी सी-लिंकवर दुचाकी पळवत असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने तिला रोखलं होतं. यावेळी महिलेने आपली चूक मान्य करण्याऐवजी वाद घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तिने पोलिसांसाठी अपशब्द वापरले. तिच्याकडे असलेली गन खरीखुरी गन नसून टॉयगन असल्याचं काही काळातच लक्षात आलं. मात्र महिलेने दुचाकी रोखल्यानंतर ती बंद करण्यास सांगितलं असता पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीही केली. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केल्यानंतरच मी बाईक बंद करणार अशा शब्दांमध्ये वाद घातला.

sanjay shinde who killed akshay shinde in an encounter get discharged from hospital
अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करणाऱ्या संजय शिंदे यांना डिस्चार्ज
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sadhguru Isha Foundation Raid News:
जग्गी वासुदेव यांच्या आश्रमाची झडती; मद्रास उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई
Delhi CM Atishi On Sonam Wangchuk
Delhi CM Atishi : दिल्लीत राजकारण तापलं, सोनम वांगचुक यांना भेटू न दिल्याने मुख्यमंत्री आतिशींचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाल्या…
kalyan girl cheated for 10 lakhs
कल्याणमधील तरुणीला अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून १० लाखाला फसवले
Vile Parle woman entered in house and stole after falsely claiming sent by domestic worker
शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव
Sanjay Raut TIEPL
Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, १५ दिवसांची शिक्षा; भाजपाची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले “त्यांनी आता…”
manoj jarage patil pc
“देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी, त्यानंतर…”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!

‘हात कापून टाकेन’

कर्मचाऱ्याने बाईक बंद करण्याचा प्रयत्न केला असता, ती संतापली आणि जाहीरपणे धमकावू लागली. “हात कापून टाकेन, माझ्या गाडीला हात लावण्याची हिंमत कशी झाली,” अशा शब्दांत महिलेने धमकी दिली. ती एवढ्यावरच थांबत नाही तर ती, “जा जाऊन नरेंद्र मोदींना फोन करा, त्यांनी जर मला सांगितलं नुपूर गाडी बंद कर, तरच मी करणार,” असं उद्धटपणे सांगत महिलेनं अरेरावी सुरू केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: हृदयद्रावक! गणपतीच्या मंडपात नाचता नाचता गेला जीव; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद

नुपूर पटेल मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असून बुलेट तेथील एका रिअल इस्टेटच्या नावावर नोंद आहे. महिलेला कलम 41A अंतर्गत तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. यानंतर तिला जाण्याची परवानगी देण्यात आली.