मुंबई स्वप्नांची नगरी आहे असे म्हंटले जाते. येथे अनेक जण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. तर याच मुंबईत हक्काचे एक घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण,मुंबईत तर भाड्याने घ्यायच्या घराच्या किमतीही गगनाला भिडलेल्या असतात. ही घर लहान-सहन असूनही त्याची किंमत प्रचंड असते. त्यामुळे मुंबईत भाड्या घर घेऊन राहणेही आता अनेक लोकांसाठी डोकेदुखी ठरते आहे. अलीकडेच एका वकिलाने या गोष्टीवर भाष्य केलं आहे आणि शहरांत भाड्याने न राहण्याचा सल्ला सर्वांना दिला आहे.

मुंबईत घर विकत घ्यायचे असो किंवा येथे भाड्याच्या घरात राहायचे असो प्रत्येकाचे बजेट मजबूत असायला हवे ; हे वेगळे सांगण्याची गरज नाही. नवीन घर खरेदी करताना त्यांच्या किंमती परवडत नसल्यामुळे अनेक इच्छुक ग्राहक भाडय़ाच्या घरात राहणे पसंत करतात. मात्र आता या शहरात भाड्याने राहणेही मोठी डोके दुखी ठरते आहे. येथील किमती गगनाला भिडल्या आहेत. अलीकडे एका एक्स (ट्विटर) युजरने मुंबईतील भाड्याच्या फ्लॅटच्या वेगाने वाढणाऱ्या किमतींबद्दल बोलत असलेली पोस्ट शेअर केली आहे. काय लिहिलं आहे नक्की यात चला पाहू…

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

हेही वाचा…VIDEO: आईने नाकारले, इकडे-तिकडे भटकू लागले; हत्तीचे पिल्लू शेवटी वनपाल यांनी घेतले दत्तक; पाहा हृदयस्पर्शी गोष्ट

पोस्ट नक्की बघा…

आपल्यातील अनेक जण नोकरीसाठी आई-बाबांपासून वेगळं होऊन, दुसऱ्या शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. पण, कोणत्याही नवीन शहरांत जायचे म्हंटल्यावर पहिल्यांदा तेथे भाड्याने घर बघावे लागते. येणाऱ्या पगारातून स्वतःचा खर्च, घराचे भाडे व कुटुंबाला पैसे पाठवणे शक्य नसते. तर ही बाब लक्षात घेता मुंबईच्या एका वकिलाने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुंबईच्या घरांच्या भाड्यांची किंमत ऐकून तिच्या मनात एक गोष्ट आली व त्यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत असे लिहिले की, ‘१ बीएचके (BHK) ची मुंबईत किंमत पन्नास ते सत्तर हजार रुपयांपर्यंत आहे. आई-बाबांना धरून राहा. स्वतंत्र होण्यासाठी घरातून पळून जाण्याची काहीही एक गरज नाही’ असा या पोस्टमध्ये मजकूर लिहिण्यात आला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @kebabandcoke या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून त्यांच्या व्यस्था मांडताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. अनेक जण त्यांच्या परिसरातील घराच्या किंमती सांगत आहेत तर काही जण पगारात घर, आरोग्य सेवा आणि शिक्षण यांचा समतोल राखणे कठीण जात आहे ; असे सांगताना दिसत आहेत.