सध्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र धामधुम सुरू आहे. कुठे भक्तीभावाने देवीची पुजा केली जात आहे तर कुठे जल्लोषात गरबा-दांडिया नृत्य केले जात आहे. सध्या गरबा दांडियावर ठेका धरतानाचे अनेक व्हिडीओ समोर येत आहे. प्रत्येक व्हिडीओ एकापेक्षा एक आहेत. कुठे कोणी आजोबा गरबा करताना दिसत आहे तर कुठे एखादी चिमुकली दांडिया नृत्य करताना दिसते आहे. दरम्यान, आता मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ Pratiksha_Vilas_ अकांउटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यातील आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, देवीचे गाणे लावून काही महिला चक्क धावत्या लोकलमध्ये गरबा नृत्य करता दिसत आहे. दरवाज्याच्या उभे राहण्याच्या जागेत या महिला फेर धरून, गोलकार वर्तुळात फिरत गरबा नृत्य करता दिसत आहे. तरुणी, महिला आणि वृद्ध महिला देखील नृत्य करताना दिसत आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर कोणी धावत्या ट्रेनमध्ये नृत्य करणे धोकादायक असल्याचे सांगत आहेत.
हेही वाचा – निस्वार्थ प्रेम! आजी आजोबांनी नातवंडांसाठी गावावरून आणला खाऊ, लोकलमधील Video Viral
एकाने लिहेल की, “जरा जपून, नाहीतर बाहेर जाल.” तर दुसऱ्याने सल्ला दिला,”सांभाळून करा, थोडसं बॅलन्स इकडे तिकडे झालं की डायरेक्ट देवाघरी” तिसऱ्याने लिहिले, “आता कसे प्रेमाने खेळता आहात तसेच इतर दिवशी पण राहात जा नाहीतर आम्ही पाहतो ट्रेनमध्ये महिला पार मारामारी करतात.”