Ganesh galli 2023 मुंबईत गणेशोत्सवाच्या सणाला एक वेगळं महत्त्व आहे. बाप्पाच्या आगमाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे चिंचपोकळी, लालबाग, खेतवाडी परिसरात वेगवेगळे मंडळ गणपती बाप्पा बसवतात. या परिसरात लाखो भक्त दर्शनासाठी जातात. विशेषत: देखाव्यासाठी नागरिक या मंडळांना भेट देतात. यामध्ये मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीत दरवर्षी अतिशय विलोभणीय असा देखावा तयार करण्यात आलेला असतो. गणेश गल्लीचा गणपती दरवर्षी नवनवीन थीम घेवून येत असतो. यंदाची थीम ही आगळीवेगळी असणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांनाही उत्सुकता लागली आहे. यंदा मुंबईच्या राजाची जबरदस्त थीम समोर आली आहे.
मुंबईच्या राजाची जबरदस्त थीम
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या राजाची थीम ही आगळीवेगळी आहे. यंदा बाप्पाच्या दरबारात शिवकालीन थीम असणार आहे. नुकताच ३५० वा राज्यभिषेक सोहळा पार पडला आहे. याच दिवसाचं औचित्य साधून मुंबईच्या राजाची थीम एतिहासीक पाहायला मिळणार आहे. यंदा गणेश गल्लीचा बाप्पा म्हणजेच मुंबईचा राजा रायगडावर विराजमान होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या थीममधून सादर केला जाईल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शिवभक्तही हा देखावा पाहण्यासाठी खूप उत्सूक आहेत. चला तर मग पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाची प्रतिकृती कशी तयार केली जात आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गडावरील तोफा, विविध मिनारी, महाल तयार केले जात आहेत. शेकडो मजूर हा देखावा उभा करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. हा देखावा पाहून अगदी शिवकालात गेल्यासारखं वाटतंय. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकांउटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. भाविकांनी देखील हा व्हिडिओ पाहून उत्सुकात दर्शवली आहे.
पाहा शिवकालीन रायगड व्हिडीओ
हेही वाचा >> Chintamani First Look 2023: चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा फर्स्ट लूक आला समोर; बाप्पाचं देखणं रूप पाहतच राहाल
गणेश उत्सव अगदी काहीच दिवसांवर येऊ ठेपला आहे. सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. यावर्षी प्रत्येक मंडळ काहीतरी आगळे वेगळे करत आहे. त्यामुळे यंदा गणेश उत्सवाला अधिकच रंगत आली आहे. काही मुंबईच्या गणेशाचे आगमनही झाले आहे.