Viral Video : मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. दरदिवशी हजारो लोक येथे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. या शहराने प्रत्येकाला आपलं केलं आहे. या शहराचा इतिहास, येथील ठिकाणे, खाद्यपदार्थ या शहराची ओळख सांगतात. मुंबईची आणखी एक खास ओळख म्हणजे येथील लोकल ट्रेन. मुंबई आणि लोकल ट्रेनचं नातं हे अत्यंत जवळचं आहे. मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी असलेली लोकल मुंबईत प्रवासाचे मुख्य साधन आहे. दरदिवशी लाखो लोक लोकलनी प्रवास करतात. मुंबईकरांच्या आयुष्यात लोकलचे स्थान अत्यंत विशेष आहे.
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये मोटरमॅन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने निवृत्ती घेतली आणि मुंबईकर त्याचा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. मुंबईकरांचे हे प्रेम पाहून कोणीही भारावून जाईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुटबुटात एक व्यक्ती दिसेल ज्यांच्या गळ्यात फुलांची माळ आहे आणि ते आणि त्यांच्यासह इतर पुरुष महिला ढोल ताशावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या रेल्वे स्थानकावरील आहे. तुम्हाला वाटेल की हे नेमकं काय प्रकरण आहे? मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये मोटरमॅन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने निवृत्ती घेतली. त्याच्या कामाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे तेथील इतर कर्मचारी आणि मुंबईकरांनी त्यांचा हा शेवटचा दिवस जल्लोषात साजरा केला आणि डान्स करत आणि आनंद साजरा करत हा दिवस आणखी खास बनवला. यावेळी काही लोकांनी त्यांचा हा जल्लोष बघायला सुद्धा चांगलीच गर्दी केली होती.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

tag_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आमच्याकडे असंच असतं. तो सेंट्रल मार्गाचा सुपरमॅन होता कारण त्यामुळे मुंबईकर वेळेत पोहचायचे. धन्यवाद मुंबईकरांची खूप चांगली सेवा केल्याबद्दल”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझ्या बाबांचे पण २०१७ ला असेच रिटायरमेंट साजरे केले होते. रेल्वेतच होते ते सुद्धा. ४१ वर्ष काम केलं… असाच बँड लावला होता. स्टेशन पासून घरापर्यंत त्यांची मिरवणूक काढली होती आम्ही..” तर एका युजरने लिहिलेय, “ही मुंबई आहे, नेहमी आनंद साजरा करते आणि हसत असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला महाराष्ट्र खूप आवडतो. आम्ही लहान गोष्टी मोठ्या उत्साहाने साजरे करतो. हीच मुंबईची सुंदरता आहे” एक युजर लिहितो, “मराठी लोकांचा स्वॅगच वेगळा असतो” तर एक युजर लिहितो, “तुमच्या सेवेबद्दल धन्यवाद” अनेक युजर्सनी या मोटरमॅन कर्मचाऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.