मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्याला नेहमी काही ना काही नवीन आणि रंजक गोष्टी पाहायला मिळतात. त्यांच्या अकाउंटवर फक्त मजेशीर गोष्टीच शेअर केल्या जात नाहीत, तर त्यामधून सामाजिक संदेश देखील दिला जातो. मुंबई पोलीस आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर वेगवेगळे मिम्स देखील शेअर करतात. नुकताच मुंबई वाहतुकी संदर्भात एक नियम जारी करण्यात आला आहे. या नियमानुसार आता दुचाकीवर बसणाऱ्या दोन्ही प्रवाशांना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस सोशल मीडियावरील आपल्या हटके अंदाजासाठीही तितकीच लोकप्रिय आहे. ते आपल्या अकाऊंटवरून ट्रेंडिंग मिम्सच्या मदतीने सामाजिक संदेशही देतात आणि नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात. सध्या इन्स्टाग्रामवर एक रील खूपच ट्रेंडिंग आहे. ‘दिस इज यु, दिस इज मी, दिस इज ऑल व्ही नीड’ या गाण्यावरील अनेक रील्स आपल्याला इन्स्टाग्रामवर सापडतील. मुंबई पोलिसांनी याच रीलची मदत घेऊन नेटकऱ्यांना हेल्मेट संबंधीच्या नव्या नियमाची आठवण करून दिली आहे. पाहा ही रील –

विमानातही असतात हॉर्न्स; जाणून घ्या हे हॉर्न्स नेमके कधी आणि कशासाठी वापरतात

काही तासांपूर्वीच पोस्ट करण्यात आलेल्या या रीलला आतापर्यंत ३५ हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ भलताच आवडला असून ते मुंबई पोलिसांच्या कल्पकतेचे कौतुक करत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.