Shocking video: असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईचीलोकल आहे. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र हीच गर्दी प्रत्येक मुंबईकराला सांभाळून घेते, वेळ प्रसंगी कुणाच्याही मदतीला उभी राहते. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होतोय. यामध्ये एका तरुणाला ओव्‍हरहेड वायरचा शॉक लागला, मात्र मुंबईकरांनी त्याला कसं वाचवलं तुम्हीच पाहा.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. असाच प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये तरुण स्टंटबाजी करताना ओव्‍हरहेड वायरला चिकटला. मात्र त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण लोकलच्या डब्यावर पडलेला दिसत आहे, यावेळी काही प्रवाशांनी त्यांला ओढणीच्या मदतीने खाली काढले. शॉक लागल्यामुळे त्याला बरंच भाजलेलं दिसत आहे मात्र प्रवाशांमुळे त्याचा जीव वाचला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आता तर हद्दच झाली! मुंबई लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण; किंकाळ्या आरडा ओरड अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ titun_biswas84533475 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओतून खरोखरच मुंबईकरांमधील माणुसकीचं दर्शन झालं. एकानं म्हंटलंय हेच ते मुंबईकरांचं स्पीरीट तर आणखी एकानं त्या तरुणावर टीका केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbaikars saved the young mans life while overhead wire accident shocking video goes viral srk