Mumbai’s Vada Pav Makes It To Top 20 In World’s Best Sandwiches List : मुंबईकर आणि वडापावचं अगदी वेगळं नातं आहे. अनेक मुंबईकरांचा सकाळचा नाश्ता, दुपारचे ते रात्रीचे जेवण सगळं काही म्हणजे वडापाव. मुंबईत नव्याने आलेल्या, स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या अनेकांचे पोट १५ रुपयांच्या वडापावने भरते. त्यामुळे अनेकांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी वडापाव हा उत्तम आधार आहे. अगदी मुंबईत राहणारी व्यक्ती असो वा मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या परदेशी व्यक्तींना मुंबईतील वडापावविषयी माहिती नाही असं होणार नाही, वडापाव हा मुंबईकरांच्या आयुष्यातील तर एक अविभाज्य भाग बनलाच आहे पण जगभरातही तो तितक्यात आवडीने खाल्ला जात आहे.

गरिबातील गरीब आणि श्रीमंतांतील श्रीमंत व्यक्तींना खमंग, खरपूस तळलेल्या वडापावचा आस्वाद घेण्यास आवडतो. त्यामुळे अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड आले गेले, पण मुंबईच्या वडापावची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत गेली. त्यामुळे मुंबईचा वडापाव केवळ भारतातच नाही तर आता जगात फेमस होत आहे. यात मुंबईचा वडापाव जगात भारी असल्याचे आता जगानेच मान्य केलं आहे.

US Ambassador HE Eric Garcetti and Consul General Mike Hankey visited mumbai keshav ji naik chawls ganeshotsav
मुंबई : संस्कृती, परंपरा जपणारी केशवजी नाईकांची चाळ
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Famous painter SH Raza prakriti painting stolen from warehouse of auction house at Bellard Pier Mumbai news
प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
mount marry fair bandra west marathi news
माऊंट मेरी जत्रेनिमित्त बेस्टच्या १२१ जादा बस
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
2000 crore turnover target for Indkal Technologies from Acer smartphone launch in India
एसर स्मार्टफोनच्या भारतात प्रस्तुतीतून इंडकल टेक्नॉलॉजीजचे २,००० कोटींच्या उलाढालीचे लक्ष्य; महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्पासाठी चाचपणी
mumbai mahanager palika, mumbai municipal corporation
मुंबई महानगर साकारताना…
hundreds of devotees going to velankanni got stuck at vasai station due to train late for 10 hours
वेलंकनीला जाणारे शेकडो भाविक वसई स्थानकात अडकले; १० तासांपासून ट्रेनच्या प्रतिक्षेत

जगभरातील सर्वात ५० प्रसिद्ध सँडविचेसच्या यादीत मुंबईच्या वडापावने १९ वे स्थान पटकावले आहे. प्रसिद्ध फूड अँड ट्रॅव्हल गाईड TasteAtlas ने सर्वात प्रसिद्ध ५० सँडविचेसची यादी जाहीर केली. या यादीत वडापावने १९ वे स्थान पटकावले आहे. मात्र गेल्या वर्षाच्या अहवालात वडापावने १३ वे स्थान पटकावले होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वडापावच्या प्रसिद्धीत काहीशी घट दिसून आली, परंतु टॉप २० मध्ये स्थान निर्माण केले.

या यादीत व्हिएतनाममधील बन्ह मि सँडविच पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तुर्कीचं टॉम्बिक सँडविच आणि लेबनानचे शोरमा सँडविच तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मऊ पाव त्यामध्ये कुरकुरीत बटाटा पॅटी (वडा) घालून बनवलेली ही एक साधी, पण चवदार अशी डिश आहे. कांदा, मिरची, तिखट आणि सॉसबरोबर त्याची चव आणखीच वाढते. वडापावचं हे वर्णन फक्त वाचूनच तुमच्याही जिभेला पाणी सुटेल. वडापाव हा एक लोकप्रिय आणि परवडणारा नाश्ता आहे, त्यामुळे भारतातील सर्व वयोगटातील लोक त्याचा आनंद घेतात. विशेषत: मुंबईतील लोकांचा वडापाव फारच आवडीचा पदार्थ आहे.

टेस्ट ॲटलसच्या दाव्यानुसार, वडापावची सुरुवात अशोक वैद्य यांनी केली. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी मुंबईतील रेल्वेस्थानकाजवळील रस्त्यावर वडापावची विक्री सुरू केली, जो त्यांच्या चवीमुळे मुंबईनंतर हळूहळू महाराष्ट्र आणि जगभरात फेमस झाला.