Shocking Murder Case: छत्तीसगढ पोलिसांनी कबीरधाम जिल्ह्यातील होम थिएटर म्युझिक सिस्टीम स्फोट प्रकरणाबाबत धक्कादायक उलगडा केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील छपला गावात म्युझिक सिस्टीमच्या स्फोटात महिलेचा पती हेमेंद्र मेरावी (३०) आणि त्याचा भाऊ राजकुमार (३२) यांचा मृत्यू झाला. आरोपी सरजू मरकम या विवाहित पुरुषाने आपल्या पूर्व गर्लफ्रेंडला म्हणजेच मृत हेमेंद्र यांच्या पत्नीस होम थिएटर भेट म्हणून दिला होता. कबीरधामचे पोलीस अधीक्षक लाल उमेद सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, तपासादरम्यान गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर आरोपीला मंगळवारी बालाघाट येथून अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेमेंद्र मेरावी यांनी ३१ मार्चला जवळच्या अंजना गावातील २९ वर्षीय महिलेशी लग्न केले आणि १ एप्रिल रोजी त्यांच्या घरी लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. सोमवारी, जेव्हा मेरावी लग्नाची भेट म्हणून मिळालेले होम थिएटर चालू करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्याचा स्फोट झाला. मेरावीचा जागीच मृत्यू झाला आणि त्याच्या मोठ्या भावासह पाच जण जखमी झाले. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळाच्या तपासादरम्यान स्फोटके आढळून आले, सदर आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने होम थिएटरमध्ये स्फोटक ठेवले होते आणि नवविवाहित जोडप्याचा सूड घेण्यासाठी म्हणून भेट दिले होते

तपासाच्या आधारे, पोलिस बालाघाटच्या मंडई भागातील एका दुकानात पोहोचले जिथून सोनी ब्रँडचे नाव छापलेली म्युझिक सिस्टीम खरेदी केली होती. इथे ही सिस्टीम मरकमनेच खरेदी केल्याची पुष्टी झाली. मरकमने पोलिसांना सांगितले की, त्याने बॉम्ब बनवण्यासाठी होम थिएटरमध्ये सुमारे २ किलो वजनाचे फटाक्यांमधून मिळवलेले अमोनियम नायट्रेट, पेट्रोल आणि गनपावडर वापरले. स्फोट घडवून आणण्यासाठी त्याने यंत्राच्या वीज पुरवठ्याचा वापर केला. पोलीस म्हणाले की, मरकमने इंदूरमध्ये २०१५-१६ मध्ये स्टोन क्रशर प्लांटमध्ये काम केले होते आणि तेथून तो अमोनियम नायट्रेट वापरून बॉम्ब कसे बनवायचे हे शिकला होता.

दरम्यान,पोलीस तपासात मेरावीची पत्नी मरकमच्या संपर्कात असल्याचे समोर आले. या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि मेरावीशी विवाह निश्चित झाल्यानंतर महिलेने त्याच्याशी बोलणे बंद केल्यामुळे मरकम रागावला होता. कॉल डिटेल्सवरून हे देखील उघड झाले की मृताच्या पत्नीने ३० मार्चला मरकमशी संपर्क केला होता. महिलेने तिचे लग्न मोडण्यास नकार दिल्यानंतर आणि मरकमशी बोलणे बंद केल्यानंतर त्याने या जोडप्याला मारण्याचा कट रचला, असेही त्याने सांगितले.

आरोपीवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 302 (खून) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे