Murder video: प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात. ज्याने प्रेम केलं आहे. तोच ही भावना समजू शकतो, ज्यावर आपण अतोनात प्रेम केलं, ज्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्न रंगवली. तोच व्यक्ती आपल्याला धोका देतो तेव्हा सगळं संपलं बस्स…आता जगायचं नाही असंच काहीस वाटतं… पण काही लोक तर गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात ते बदला घेण्याची मानसिकता ठेवतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. प्रेमात लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. तर काही असे ही लोक असतात जे प्रेमाला खेळ समजतात. सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे. जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एका तरुणीनं एका तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तो तरुण इतका संतापला की त्याने तिला भयानक शिक्षा दिली. तरुणानं भर रस्त्यात तरुणीची तलवारीने वार करत हत्या केली. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.
‘तू माझी झाली नाहीस तर…’
ही घटना पंजाबच्या मोहालीमध्ये शनिवारी सकाळी घडली आहे. या ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावर एका ३६ वर्षीय व्यक्तीने ३१ वर्षीय महिलेची तलवारीने हत्या केली. पीडित महिला कामावर जात असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला. महिलेने लग्नास नकार दिल्याने आरोपीने हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गजबजलेला रस्ता आणि लोकांची उपस्थिती असतानाही मुलीच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. हल्लेखोर रस्त्याच्या मधोमध लोकांसमोर तरुणीवर तलवारीने हल्ला करत राहिला आणि मुलगी मदतीसाठी ओरडत राहिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
लग्नास नकार दिल्याने भररस्त्यात हत्या
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी काही वेळातच अटक केली असली, तरी त्याची ओळख उघड झाली नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोहालीच्या फेज ५ मधील एका बँकेत काम करणारी ३१ वर्षीय बलजिंदर कौर इतर तीन मुलींसह ड्युटीवर जाण्यासाठी ऑटोमधून खाली उतरताच, तिची वाट पाहणाऱ्या एका तरुणाने अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला सुरू केला. मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी धावली, मात्र हल्लेखोर तिचा पाठलाग करत राहिला आणि तिच्यावर हल्ला केला. मुलगी जखमी होऊन खाली पडल्यानंतरही हल्लेखोराने तिच्यावर हल्ला सुरूच ठेवला. त्यानंतर घटनास्थळावरून तो पळून गेला. मुलीला मोहालीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता तिचा मृत्यू झाला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मृत्यूपूर्वीचा शेवटचा Video! अचानक पाणी वाढलं, पर्यटकांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण शेवटी…
बलजिंदर कौरचा भाऊ धरमप्रीत सिंग यांनी सांगितले की, त्यांची बहीण नेहमीप्रमाणे शनिवारी त्यांच्या गावातून बसमध्ये चढली होती, परंतु सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांना तिच्या व्यवस्थापकाचा फोन आला ज्याने त्यांना या घटनेची माहिती दिली. “आम्ही ताबडतोब मोहालीला धाव घेतली आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. डीएसपी (शहर-1) मोहित अग्रवाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, त्यांनी समराळा शहरातील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आरोपीला सुकचैन सिंगला अटक केली आहे.