BTS K-pop Fans Dream and Reality in Marathi : “बॅक-अप डान्सर नव्हे, ‘के-पॉप आयडॉल’ होण्यासाठी आम्ही घरातून पळून गेलो होतो”, असे १५ वर्षांच्या सनाने (नाव बदलले आहे) सांगितले. आपल्याच घराच्या अंगणात ती बसली होती. कुटुंबाची करडी नजर तिच्यावर होतीच. हे प्रकरण साधारण सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले जेव्हा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधून तीन किशोरवयीन मुली घरातून पळून गेल्या. सप्टेंबर महिन्याच्या एका दुपारी सना, तिची १३ वर्षीय चुलतबहीण सानिया (नाव बदलले आहे) व १६ वर्षीय शाळेतील मैत्रीण (फातिमा) अशा त्या तिघी घरातून बाहेर पडल्या. त्यावेळी सनाचे वडील गावाबाहेरील द्राक्ष बागेत काम करीत होते. सना, सानिया आणि फातिमा तिघींनी टोटोचालकाला (स्थानिक चारचाकी वाहन) हुगळीमार्गे घाटावर नेण्यासाठी १५ रुपये दिले. तेथून १० रुपये देऊन, त्या बोटीने मुर्शिदाबादला पोहोचल्या. तेथून त्या तिघीही जवळच्या रेल्वेस्थानकावर गेल्या आणि कोलकाता शहरातलं सियालदहला स्टेशन जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसल्या.

रेल्वेगाडी सुटण्याच्या काही मिनिटांपूर्वी सनाने फातिमाच्या मोबाइल फोनवरून तिच्या वडिलांना एक मेसेज पाठविला : “आम्हाला शोधू नका. आम्ही ‘के-पॉप आयडॉल’ होण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करणार आहोत. आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.” आणि मोबाईल बंद करण्यात आला. त्यानंतर त्या कुटुंबांनी आणि पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. या मुलींनी आधी मुंबईला आणि तेथून कोरियन पॉप संस्कृती वारसा असलेल्या सोल या शहरात जाण्याचा बेत आखला होता. पण, ४८ तासांनंतर कोलकात्याजवळील शालीमार स्थानकावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि अखेर त्यांना मुर्शिदाबादला पुन्हा घरी आणण्यात आले.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!
Municipal Corporation Election, Pimpri Chinchwad ,
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Hapus season delayed , Hapus pune, pune, mango ,
पुणे : पावसामुळे हापूसचा हंगाम सुरू होण्यास विलंब, मार्केट यार्डात हंगामपूर्व हापूसची पहिली पेटी दाखल

हे ‘बीटीएस’ म्हणजे काय?

“आमची शाळा ‘बीटीएस’च्या चाहत्यांनी भरलेली आहे,” असे सनाने एका प्रसिद्ध कोरियन बॉय बँडचा संदर्भ देत सांगितले. ‘बीटीएस’ (Bangtan Sonyeondan, Bulletproof Boy Scouts), ज्यांना Bangtan Boys म्हणूनही ओळखले जाते. साधारण २०१० मध्ये स्थापन झालेला या कोरियन बॉय बँडमध्ये जिन, सुगा, जे-होप, आर एम, जिमीन, व्ही व जंगकूक हे सात तरुण आहेत. मुळात हा एक हिप हॉप डान्सर ग्रुप आहे. आपल्या कोरियन गाण्यांमधून त्यांनी मानसिक आरोग्य, शालेय वयातील तरुणांचे प्रश्न, स्वत:वर प्रेम कसे करावे अशा विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘बीटीएस’ने अभूतपूर्व जागतिक मान्यता मिळवली आहे.

काही वर्षांपासून भारतासह जगभरात कोरियन संस्कृतीची लाट पसरली आहे; ज्यामुळे दक्षिण कोरियन संस्कृती दर्शविणाऱ्या ‘कोरियन ड्रामा’ आणि ‘के-पॉप’ला खूप लोकप्रियता मिळाली. कोरियन खाद्य संस्कृतीपासून म्युझिकपर्यंत अनेक रंजक गोष्टींची माहिती जगभरातील चाहत्यांना कोरियन ड्रामा आणि के-पॉपमुळे मिळाली. स्वस्त मोबाईल फोन्स आणि स्वस्त डेटामुळे कोरियन संस्कृतीची ही लाट, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादपासून तमिळनाडूमधील करूरपर्यंत देशाच्या काही दुर्गम भागांतही सहज पोहोचली.

भारतासह पाकिस्तानमध्ये घडली होती अशीच घटना

जानेवारी २०२४ मध्ये करूर येथील १३ वर्षांच्या तीन मुलींनी विशाखापट्टणम बंदरातून सोलला जाण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी पाकिस्तानमधील तीन किशोरवयीन मुलींनीही ‘बीटीएस बँड’च्या सदस्यांना भेटण्यासाठी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घटनांतील किशोरवयीन मुलींना त्यांच्या संबंधित राज्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सुरक्षितपणे घरी पोहोचवले.

Teenagers from remote villages in India chase K-pop dreams, highlighting the global reach of Korean pop culture. (Credit: Suvajit Dey)
भारतातील दुर्गम खेड्यातील किशोरवयीन तरुण-तरुणी के-पॉप आयडॉल होण्याचे स्वप्न पाहतात. कोरियन पॉप संस्कृतीची जागतिक पोहोच दर्शवणारे हे चित्र (फोटो सौजन्य – सुवजित डे/ इंडियन एक्स्प्रेस)

मुर्शिदाबादमध्ये त्यावेळी काय घडले?

मुर्शिदाबादमध्ये मानवी तस्करी/सेक्सरॅकेट/देहविक्रय या गोष्टी सर्रास चालतात आणि बहुतेक हरवलेल्या मुली कधीही घरी परत येत नाहीत. त्यामुळे घरातून पळून गेलेल्या मुलींसह असेच काहीसे घडले असावे, असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटले होते. पण, काही तासांनी सनाने वडिलांना मेसेज पाठविला आणि या प्रकरणाला नवे वळण मिळाले. “जेव्हा आम्हाला सनाचा मेसेज आला, तेव्हाच आम्हाला समजले की, त्या पळून गेल्या आहेत. तोपर्यंत मला ‘बीटीएस’बद्दल किंवा दक्षिण कोरिया हा एक देश आहे हेदेखील माहीत नव्हते,” असे त्या मुलीच्या वडिलांनी सांगितले.

मेसेज पाहिल्यानंतर सनाची आई धावतच जवळच्या पोलिस ठाण्यावर पोहोचली; जे साधारण पाच किलोमीटर लांब होते. काही तासांतच बेपत्ता मुलींबाबत राज्यभर अलर्ट जारी करण्यात आला आणि स्थानिक पोलिसांनी फातिमाचा फोन ट्रॅक करण्यास सुरुवात केली. बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी जो प्रयत्न सुरू होते, त्याला साधारण चार तासांनी यश आले, जेव्हा सना, फातिमा आणि सानिया सियालदह स्थानकावर पोहोचल्या. त्या तिघींकडे फक्त एक मोबाईल फोन, १५०० रुपये, ओळखपत्र व काही कपडे होते.

“सियालदह येथे मुली स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये त्या राहिल्या होत्या. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळखपत्रे घेतली आणि अल्पवयीन असूनही त्यांना एका रात्रीसाठी खोली भाड्याने दिली.” असे गावात ट्रॅव्हल बुकिंग सेंटर चालविणाऱ्या मुलींच्या काकांनी (३० वर्षीय) सांगितले.

दुसऱ्या दिवशी घरातून पळून गेल्यानंतर सुमारे २४ तासांनंतर मुलींनी हॉटेलमधून चेकआउट केले आणि फोन चालू केला. काकांनी सांगितले, “फोनच्या लोकेशनवरून त्या शालिमार स्थानकाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. स्थानिक पोलिसांनी शालिमार स्थानकावरील रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) ही माहिती दिली. तिघीही जेव्हा ट्रेनमधून उतरल्या तेव्हा आरपीएफ जवान त्यांची तिथे वाट पाहत होते.

सना, फातिमा आणि सानिया तिघींना मुर्शिदाबादला घरी सुखरूप परत आणल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले आणि नियमानुसार एका आठवड्यापेक्षा जास्त काळ सरकारी निवारागृहात राहावे लागले. त्या काळात पोलिसांनी त्यांच्या घरातून पळून जाण्याच्या हेतूबद्दल चौकशी केली. त्या का पळून गेल्या होत्या किंवा त्यांनी कोरियाला जाण्याची योजना कशी आखली हे सांगणे त्यांना अवघड जात होते. सानियाने सांगितले की, “तिला कोरियाला जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा आणि पालकांची परवानगी आणि पाठिंबा लागतो हे माहीत नव्हते.”

“सानिया, सना आणि फातिमा यांनी थेट दक्षिण कोरियाला जाण्याचा विचार केला नाही. त्यांना प्रथम म्युझिक आणि डान्स शिकण्यासाठी मुंबईला जायचे होते आणि नंतर ‘के-पॉप’ स्टार बनण्यासाठी त्यांची निवड व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी ही सर्व माहिती मोबाईलवर शोधली होती.

पंधरा वर्षीय मुलीच्या आईने सांगितले की, त्यांना वाटत होते, ” ‘के-पॉप’ आयडॉल बनल्याने त्यांना भरपूर पैसे कमावण्यास मदत होईल. तेव्हापासून कुटुंबाने के-पॉपसंबंधी गोष्टी पाहण्यावर बंदी घातली होती.”

“आमच्या शाळेच्या वसतिगृहातील अर्ध्या मुली ARMY आहेत,” असे सानियाने हळुवारपणे सांगितले. बीटीएसच्या जगभरातील चाहत्यांना ARMY, असे संबोधले जाते; ज्याचा फुल फॉर्म Adorable Representative M.C. for Youth, असा आहे. या मुली जवळच्या गावातील निवासी शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांनी ठरवले होते की, सर्व जणी एकाच वेळी घरातून बाहेर पडतील; जेणेकरून ते त्यांचे ‘के-पॉप आयडॉल’ होण्याचे स्वप्न साध्य करण्यासाठी मुंबईला पळून जाऊ शकतील.

जेव्हा फातिमा, सना आणि सानिया घरातून पळून गेल्या तेव्हा त्यांच्या जवळपास २,६०० रहिवाशांच्या गावात ही बातमी पसरायला फारसा वेळ लागला नाही. मुलींच्या अशा पळून जाण्यावर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी जोरदार टीका केली. लोकांना वाटले की, मुली एखाद्या तरुणासह पळून गेल्या आहेत. “आम्ही त्यांना अनेक वेळा विचारलं की, एखादा तरुण यात सामील आहे का; पण त्या सांगत राहिल्या की, त्या ‘के-पॉप आयडॉल’ होण्यासाठी निघाल्या होत्या. संगीत आणि नृत्य हे इस्लाममध्ये हराम (निषिद्ध) आहे. मला माझ्या मुलींची लग्नंही लावायची आहेत,” असे सनाच्या मुलीच्या आईने सांगितले.

सनाच्या काकूने सांगितले, “बोर्डिंग स्कूलमधून घरी आल्यानंतर जितका वेळ ती घरी होती ती फक्त ‘बीटीएस’चे व्हिडीओ पाहत असायची. जर मी ‘बीटीएस’ला बोगस आहे, असे म्हटले तर ती चिडायची. पण बीटीएसमुळे ती एके दिवशी घरातून पळून जाईल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती.”

सना सांगते, “साधारण तीन वर्षापूर्वी मोबाईलवर स्क्रोल करताना मला पहिल्यांदा या बँडबद्दल समजले. मी ऐकलेले पहिले ‘बीटीएस’चे गाणे ‘डायनामाइट’ हे होते. मला बँडचे सर्व सदस्य आवडतात. मी इतर के-पॉप ग्रुपची गाणीदेखील ऐकते.” काही काळाने तिची लहान चुलत बहीण सना देखील बीटीएसच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.

कोरियन खाद्यपदार्थांचेही तरुणाईला आहे आकर्षण

कोरियन पॉप कल्चर युनिवर्सची झलक दाखवणारे कोरियन खाद्यपदार्थ आणि वस्तूंची शहरांमध्ये कमतरता नाही, पण तुलनेने मुर्शिदाबादमधील चाहत्यांसाठी यापैकी काहीच उपलब्ध नाही. याबाबत सना सांगते, “आम्हाला जे काही मिळते त्यात आम्ही खूश आहोत. आम्ही मैत्रिणींसह कोरियन खाद्यपदार्थांवर चर्चा करत नाही. आम्हाला ते खाण्याची इच्छा झाली तरी ते इथे कुठे मिळणार? आम्ही कोणत्याही बीटीएसच्या अधिकृत फॅन क्लबचा भाग नसलो, तरी गावात आणि शाळेत त्यांच्या मैत्रिणींसह ‘बीटीएस’बाबतचर्चा करून चाहत्या म्हणून आमचे प्रेम व्यक्त करतो.” सनाचे काका सांगतात, “अर्थात, त्यांना कोरियन फूड खायचे आहे, पण त्यांच्या इच्छेचा इथे काहीच उपयोग नाही.”

K-Pop craze spread to every corner of India
कोरियाची ही संस्कृती आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात कशी पसरली? (फोटो सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ प्राजक्ता राणे)

मुर्शिदाबाद येथून सुमारे १५० किमी अंतरावर, पश्चिम बंगालच्या सुंदरबनच्या जंगलाला लागून असलेल्या कटाखली गावात १३ वर्षांची सुबर्णा आरिया आलो ही मुलगी राहते. मोबाइलवर दिसलेल्या एका जाहिरातीमुळे २०१८ मध्ये सुबर्णाला ‘बीटीएस’बाबत माहिती मिळाली. मोबाइलवर ऑनलाइन शोध घेतल्यानंतर ‘बीटीएस’ सदस्य किम ताए-ह्युंगबाबत समजले, जो ‘व्ही’ नावानेही ओळखला जातो. बीटीएस आणि के-पॉपसाठी वाटणाऱ्या प्रेमाबाबत कसलाही संकोच न बाळगता सुबर्णा बिनधास्तपणे सांगते, “माझ्या मैत्रिणींनी मला सांगितले की, ‘व्ही(V)’ हा फार गोंडस दिसतो.”

“ते आम्हाला सर्व छान गोष्टी शिकवतात. जसे की, इतरांवर प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम केले पाहिजे. “जर पालकांनी आम्हाला ‘बीटीएस’ आवडत नाही असे सांगितले, तर आम्ही आमच्या पालकांचे ऐकले पाहिजे. मला त्यांनी दिलेले संदेश आवडतात. त्यांनी मला अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले, जेणेकरून मला चांगली नोकरी मिळेल,” असेही सुबर्णा सांगते.

हेही वाचा – टॅटू काढायचा आहे पण भीती वाटते का? टॅटू काढणे खरंच सुरक्षित आहे का? टॅटूमुळे आरोग्याला काही धोका आहे का?

“माझ्या मुलीला ‘के-पॉप आयडॉल’चे वेड लागले तरी चालेल”

दक्षिण पश्चिम बंगालमध्ये वर्षानुवर्षे तस्करीच्या घटना पाहिलेल्या सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सुबर्णाची आई सकिला खातून यांना आपल्या लेकीला बीटीएस सदस्यांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाबाबत चिंता वाटत नाही. त्या सांगतात की, “त्या दूरवर असलेल्या बॉय बँडपेक्षा या भागातील लोक फार वाईट आहेत. माझ्या मुलीबरोबर गोड गोड बोलून तिला लैंगिक तस्करी करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एखाद्या व्यक्तीपेक्षा माझ्या मुलीला ‘के-पॉप आयडॉल’चे वेड लागले तरी मला चालेल.”

अनेक ग्रामीण पालकांप्रमाणे खातून यांनाही के-पॉप जग पूर्णपणे समजत नाही. खातून सांगतात की, “मला दररोज माझ्या मुलीकडून ‘बीटीएस’बद्दल शिकायला मिळते.” खातून यांनी सुबर्णाला एके दिवशी कोलकाता येथील एका कोरियन रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाण्याचे वचन दिले आहे, जेणेकरून मुलीने बीटीएस सदस्यांना जे खाद्यपदार्थ बनवताना पाहिले आहे ते ती खाऊ शकेल.”

मी घर सोडून जाणार नाही….”

काही महिन्यांपूर्वी सुबर्णाने तिचा पॉकेट मनी
(रु. १०००) एका मैत्रिणीला दिले, जी सुमारे ५० किमी दूर असलेल्या बसीरहाट शहरातील एका गावाच्या जत्रेमध्ये गेली होती. सुबर्णा सांगते, “मी तिला स्टेशनरी, रंगीबेरंगी पेन आणि स्टीकर्स यांसारखे बीटीएससंबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. ‘बीटीएस’संबंधित वस्तू ऑनलाइन उपलब्ध आहेत, परंतु त्याची किंमत खूप जास्त आहे. मला १००० रुपये वाचवायला जवळपास एक वर्ष लागले.”

सोलमध्ये त्यांच्या आयडॉलला भेटण्याच्या आशेने तिच्यासारख्या तरुणांनी घर सोडल्याचे सुबर्णाने ऐकले आहे, परंतु तसे करण्याची तिची कोणतीही योजना नाही. ती सांगते की, “मला मिळणाऱ्या संधींची मी वाट पाहीन आणि माझ्या पालकांच्या संमतीनेच मी हा प्रवास करेन.”

सुबर्णाप्रमाणेच २१ वर्षीय सिमरन भाटी हिचे के-पॉप जग १५ इंच स्क्रीनपुरते मर्यादित आहे. नवी दिल्लीपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या हरियाणाच्या कुरळी गावात राहणारी ही महाविद्यालयीन विद्यार्थी सांगते, “मला २०१७ मध्ये कोरियन ड्रामाबाबत समजले आणि मग मी ‘बीटीएस’चे ‘DNA’ हे गाणे ऐकले. पण, माझ्या आसपास के-पॉप किंवा के-ड्रामाबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. शाळेतील किंवा गावातील मैत्रिणी माझ्या बीटीएसवरील प्रेमाची चेष्टा करत असत, पण त्यात आता थोडा बदल झाला आहे.”

काही महिन्यांपूर्वी ती तिच्या शेजारच्या आणखी दोन ‘बीटीएस’ चाहत्यांना भेटून खूप उत्साहित झाली होती. त्यापैकी एक १६ वर्षांची होती, तर दुसरी १२ वर्षांची होती. आम्ही सहसा भेटत नाही, पण जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्ही बीटीएसच्या सामान्य फॅनगर्ल्ससारखे वागतो”, असे सिमरनने सांगितले.

सुबर्णाप्रमाणेच सिमरनची इच्छा आहे की, तिला BTS संबंधित वस्तू आणि कोरियन खाद्यपदार्थ अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावेत. “BTS संबंधित वस्तू महाग आहे. मी यावर पैसे खर्च केले तर माझ्या पालकांना ते आवडेल असे मला वाटत नाही. मला के-पॉप आवडतात, यासाठी त्यांची काही हरकत नाही; पण मला घरात बीटीएस सदस्यांचे पोस्टर्स लावण्याची परवानगी मिळेल मला असे वाटत नाही”, असेही ती म्हणाली.

कोरियन पॉप संस्कृतीची इतकी ओढ का?

सिमरन सांगते की, “लहान शहरे आणि ग्रामीण भागातील तरुणाईला कोरियन पॉप संस्कृतीची इतकी ओढ का आहे, ज्यासाठी ते घर सोडायला तयार होतात हे मी समजू शकते. कदाचित शहरी चाहत्यांच्या तुलनेत आम्हाला सर्व गोष्टी फक्त ऑनलाइन पाहाव्या लागतात, जे आम्हाला के-पॉप इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची संधी देत आहे. के-पॉप चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी ग्रामीण भागात कोणताही कार्यक्रम आयोजित केला गेला आहे, असे मला वाटत नाही.”

त्यानंतर प्रत्येक BTS सदस्यांच्या संघर्षाबाबतही ती सांगते. बीटीएसचे सदस्य अभूतपूर्व जागतिक स्टारडम मिळविण्यासाठी सुरुवातीपासून कसे नम्रपणे वागत आहेत. BTS सदस्यांच्या संघर्षाची गोष्ट त्यांच्या चाहत्यांमध्ये स्वप्ने पाहण्याची आणि पूर्ण करण्याची इच्छा निर्माण करत आहे, हे देखील तिने सांगितले.

हेही वाचा – टॅटूसाठी वापरली जाणारी शाई आणि सुई सुरक्षित आहे की नाही, हे कसे ओळखावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

भारतीय, ज्यांनी कोरियन इंडस्ट्रीमध्ये निर्माण केले स्वत:चे स्थान

BTS सदस्यांचे लाखो चाहते आहेत जे त्यांच्याप्रमाणे के -पॉप आयडॉल होण्याचे स्वप्न पाहतात, पण प्रत्येकाच्या स्वप्नांचा असा अंत होत नाही.

२०२३ मध्ये ओडिसाच्या राउरकेला येथील श्रिया लेंका यांनी अनेक महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि ऑडिशन दिल्यानंतर ब्लॅकस्वान या K-पॉप बँडमध्ये सामील होणारी पहिली भारतीय ठरली. सध्या २० वर्षांची श्रिया कोरियातील सोलमध्ये राहत असून अगदी के-पॉप कलाकारसारखे दिसणारे स्वत:चे फोटो पोस्ट करते.

श्रिया लेंकानंतर आणखी एका भारतीय मुलीने या इंडस्ट्रीत आपले नाव कोरले आहे. वीस वर्षांची आरिया ही केरळची आहे आणि जी पाच सदस्यीय ‘X: IN’ (एक्स इन) नावाच्या म्युझिक ग्रुपमधील एक गायिका आणि डान्सर आहे.

भारतातील अशीच एक के-पॉप चाहती असलेली झोई हिने थाई पॉप शोमध्ये सहभाग घेतला होता, जिथे स्पर्धकांना पॉप आयडॉल बनण्याची संधी मिळते. थाई-पॉप आधारित रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणारी झोई ही पहिली भारतीय आहे.

अनुपम त्रिपाठी हा दक्षिण कोरियामध्ये राहणारा भारतीय अभिनेता आहे, जो नेटफ्लिक्सवरील २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या के ड्रामा सीरिज स्क्विड्स गेममध्ये ‘अली अब्दुल’च्या प्रमुख भूमिकेसाठी ओळखला जातो.

भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री अनुष्का सेन तिचा पहिल्या कोरियन चित्रपट ‘आशिया’द्वारे कोरियन इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

हेही वाचा – गरोदर आईच्या ध्रूमपानामुळे मुलीला वेळेआधीच मासिक पाळी येण्याचा धोका? संशोधनातून समोर आलेली माहिती

आता भारतातही तयार होत आहे पॉप कल्च

मिकी मॅकक्लेरी (Mikey McCleary) हे न्यूझीलंडचे गीतकार, संगीतकार, परफॉर्मर, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत, जे २००७ पासून भारतात मुंबई येथे राहत आहेत. मिकी मॅकक्लेरी अनेक वर्षांपासून पॉप इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी ए. आर. रहमान आणि लकी अली सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. नुकताच मिकीने त्याच्या म्युझिक व्हिडीओच्या प्रदर्शित करून पदापर्ण केले. त्याचबरोबर त्याने ‘W.I.S.H’ नावाचा पहिला पॉप बँड देखील लॉंच केला, ज्यामध्ये सर्व भारतीय मुली आहेत. या ग्रुपमध्ये री (रिया दुग्गल), सिम (सिमरन दुग्गल), झो (झोई सिद्धार्थ) आणि सुची (सुचिता शिर्के) यांचा समावेश आहे.

जरी कोरियन ड्रामा आणि के पॉप इंडस्ट्रीमध्ये काही भारतीयांनी स्वत:चे स्थान निर्माण केले असले तरी अनेकांसाठी ही स्वप्न पूर्ण करणे अजूनही खूप अवघड आहे. त्यांच्यासाठी सोल अजूनही खूप दूर आहे.

(टीप – सदर लेख नेहा बांका यांच्या इंडियन एक्स्प्रेसमधील प्रसिद्ध लेखावर आधारित आहे.)

Story img Loader