हॉटेल, रेस्टॉरंटमधील भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ग्राहकांच्या चुकीमुळे वादाला सुरुवात होते, तर कधी हॉटेल कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागण्यामुळे भांडण सुरू होते. अनेकदा ही भांडणं इतकी टोकाला पोहोचतात की हॉटेलमध्येच हाणामारी सुरू होते. काही वेळा ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असतात. अशाचप्रकारे दिल्लीतील मुर्थल येथील एका प्रसिद्ध ढाब्यावर पराठ्यावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार भांडण झाले. हे भांडण इतके वाढले की, ग्राहक आणि कर्मचारी एकमेकांना हातात मिळेल त्या वस्तूंनी मारहाण करू लागले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दोन ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणात हॉटेल कर्मचाऱ्यांनी लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली, इतकेच नाही तर ग्राहकांना खाण्याच्या प्लेट्सनीही ते मारताना दिसत आहेत.

भांडणात फाडले एकमेकांचे कपडे

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की, ढाब्यावरील कर्मचारी मोठ्या संख्येने या भांडणात सहभागी आहेत. यावेळी ते सर्व जण मिळून दोन ग्राहकांना बेदम मारहाण करत आहेत. या हाणामारीत एक-दोन जणांचे कपडेही फाटले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी या भांडणाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडीओसोबत या घटनेची तारीख आणि वेळ नमूद करण्यात आलेली नसली तरी हा व्हिडीओ अलीकडचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंबानी कुटुंबीय रोज पितात ‘या’ खास गायीचे दूध? पुण्यात होते या दुधाचे उत्पादन, वाचा सविस्तर

पराठ्याच्या ऑर्डरवरुन झाली भांडणाला सुरुवात

या भांडणाचे खरे कारण समोर आलेले नाही. परंतु काही वृत्तांनुसार, पराठ्याच्या ऑर्डरवरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये हे भांडण झाले. यानंतर हे भांडण थेट हाणामारीवर जाऊन पोहोचले. मात्र, नंतर ढाब्याच्या इतर काही कर्मचाऱ्यांनीही या भांडणात उडी घेत भांडण करणाऱ्या ग्राहकांना मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत; अनेकांनी ढाब्यावरील कर्मचाऱ्यांच्या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, हे हॉटेल ट्रक ड्रायव्हर्ससाठी बनवण्यात आले होते, पण आज या ढाब्याचे दर असे झाले आहेत की, येथे कधीही ट्रक ड्रायव्हर पाय ठेवू शकत नाही. डाळ एका लहान बादलीत दिली जाते, जी एका व्यक्तीलाही पूरत नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, मुर्थलमध्ये हे नेहमीच घडते, सुखदेव ढाब्यावर कधीही जाऊ नका, त्यांचा स्टाफ खूप गलिच्छ आहे आणि तो ग्राहकांशी नेहमी उद्धटपणे बोलतो.