भारतीय संगीत क्षेत्रात सातत्याने बदल घडत आहेत. आजही विविध संगीत प्रकारांतील ती गोडी टिकून आहे. पण, संगीत क्षेत्रातील बदलांबरोबर वादन क्षेत्रातही अनेक बदल घडून येतात दिसतात. पूर्वीच्या पारंपरिक वाद्यांची जागा आता नव्या आधुनिक वाद्यप्रकारांनी घेतल्याचे दिसते. पूर्वी एखादे वाद्य वाजविण्यासाठी वादनकाराचे कौशल्य पणाला लागायचे. पण आता मोबाईलवर सहजपणे तुम्हाला पाहिजे तो वाद्य प्रकार वाजविता येऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारे एक संगीतकार आयपॅडवर सतार वाजविताना दिसतोय. त्याने वाजविलेले संगीत खरोखरच अफलातून आणि मंत्रमुग्ध करणारे होते; जे ऐकून उद्योगपती आनंद महिंद्रादेखील प्रभावित झाले. महेश राघवन असे त्या संगीतकाराचे नाव आहे. आनंद महिंद्रांनी आयपॅडवर सतार वाजवितानाचा एक व्हिडीओ पोस्ट करीत त्याच्या कलेचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिंद्रांनी महेशच्या आधुनिक संगीत कलेचे कौतुक करीत २०२३ मधील त्याचा व्हायरल व्हिडिओ शेअर केला; ज्यात संगीतकार महेश राघवन आपल्या iPad वर काही अॅप्लिकेशनचा वापर करून सुरेल राग सिंधुभैरवी वाजविताना दिसतोय.

महेशने त्याच्या डिव्हाइसवर वाजविलेले सुरेल संगीत ऐकून आनंद महिंद्रादेखील मंत्रमुग्ध झाले. त्यावर आनंद महिंद्रांनी म्हटले की, मला विश्वास बसत नाही की, मी अशा जगासाठी तयार आहे की, जिथे संपूर्ण ऑर्केस्ट्रामध्ये संगीतकार असू शकतात; ज्यातील प्रत्येक जण त्याचे आवडते ‘वाद्य’ चक्क आयपॅडवर वाजवू शकतो. पण, मला कबूल करावे लागेल की, मी महेश राघवनची कला पाहून खरेच खूप प्रभावित झालो आहे; ज्याचे सोशल मीडियावरही खूप मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत, असे आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

तो अतिशय उत्कृष्टरीत्या त्या ‘डिव्हाइस’मधून सुरेल संगीत काढण्यास माहीर झाला आहे. भारतीयांमध्ये नवीन तंत्रज्ञानात प्रवेश करणे, ते आत्मसात करणे आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची हातोटी आहे, असेही आनंद महिंद्रांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

महिंद्रांनी केलेल्या कौतुकाने भारावून जात महेश राघवननेही एक नवीन पोस्ट करीत त्यांचे आभार मानले; ज्यावर आनंद महिंद्रांनी पुन्हा त्याने या कलेसाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. आनंद महिंद्रांनी लिहिले की, तू यास पात्र आहेस. फक्त तुझ्या कौशल्याचे नाही, तर त्यासाठी तू घेतलेल्या परिश्रमांचेही कौतुक आहे.

आनंद महिंद्रांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीत व्हायरल होत आहे. अनेकांना संगीतकार महेश राघवन याने आयपॅडवर वाजविलेले संगीत आवडले आहे. खरेच, शास्त्रीय संगीताची कला डिजिटलायजेशनच्या दिशेने जात आहे; ज्यात राघवनसारखे कलाकार आघाडीवर आहेत. ही एक अनोखी, नवीन सिम्फनी आहे; जिथे संगीत स्टॅण्ड स्क्रीन स्टॅण्डमध्ये बदलले जात आहे. पण, तरीही सुसंवाद मात्र कायम आहे, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

महेश राघवन हा दुबईस्थित एक कर्नाटक (दक्षिण भारतीय शास्त्रीय) संगीत फ्युजन कलाकार आहे. तो त्याच्या iPad वर GeoShred नावाच्या ॲपवर कर्नाटकमधील संगीत वाजवीत असतो.