देशात राजकारण आणि जातीय भूमिकांमुळे अनेकदा हिंदू-मुस्लिम वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील पण हिंदू -मुस्लिम एकता दर्शविणाऱ्या घटना फार क्वचितच घडतात. सध्या अशाच एका घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. वाराणसीमध्ये रामनवमीनिमित्त सुरु असलेल्या धार्मिक सोहळ्यात मुस्लिम महिलांच्या गटाने सहभाग घेतला. यावेळी या मुस्लिम महिलांनी भगवान श्री राम आणि जानकी माता यांची आरती केली.
मुस्लिम महिला फाउंडेशन आणि विशाल भारत संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ही सोहळा साजरा करण्यात आला. मुस्लिम महिला फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नाजनीन अन्सारी यांनीही उर्दूमध्ये ही आरती गायली. या महिलांना त्यांच्या रोजा (उपवास) दरम्यान हा विधी पार पाडला. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवामध्ये हा उपवास केला जातो.
मुस्लिम महिलांनी साजरी केली रामनवमी
नाजनीन अन्सारी यांनी या सोहळ्याचे काही फोटो सोशल मिडियावर ट्विट केले आहेत.
हेही वाचा: हेलीकॉप्टरमधून घेऊ शकता केदारनाथचे दर्शन, काय आहे हे IRCTCचे खास पॅकेज, जाणून घ्या
याबाबत टाईम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया देताना नाजनीन यांनी ,सांगितले की, “धर्म वंश किंवा मातृभूमी बदलू शकत नाही. “जोपर्यंत आमचे पूर्वज श्रीरामाच्या नावाशी जोडले गेले होते तोपर्यंत आमच्याकडे जगभरात आदराने पाहिले जात होते, पण आता ते आमच्याकडे संशयाने पाहतात. आपण आपल्या मुळाशी जोडलेले राहिलो तर आपली प्रतिष्ठा अबाधित राहील. भारत ही शतकानुशतके ‘सनातनी’ परंपरांची भूमी आहे आणि येथे जो कोणी राहतो तो हिंदू आणि सनातन संस्कृतीचा आहे,” असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा : आता रेल्वेच्या डब्यांमध्ये मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; अंधेरी, बोरिवली स्थानकावर सुरु होणार रेस्टॉरंट-ऑन-व्हील
तसेच रजिया सुलतान यांनी सांगितले की, “आम्ही भारतीय संस्कृती कधीही सोडणार नाही, म्हणूनच आम्ही रोजा पाळत आहोत आणि रामजीची आरती देखील करत आहोत, यामुळे फक्त प्रेम पसरेल आणि कोणताही धर्म धोक्यात येणार नाही.”
भारतीय अवाम पार्टीच्या अध्यक्षा नजमा परवीन यांनी सांगितले, ‘आम्ही जगात कोठेही राहू, आम्ही भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करू.”
सोशल मिडियावर मिळावा संमिश्र प्रतिसाद
पातालपुरी मठाचे महंत बलकदास यांच्या नेतृत्वाखाली लम्ही गावातून रामपंथाने काढलेल्या श्री राम ध्वज आणि राम कलश यात्रेत मुस्लिम महिलांनीही सहभाग घेतला. मात्र मुस्लिम महिलांनी रामाची पूजा केल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सनी त्याचे कौतुक केले तर काहींनी आक्षेप घेतला.