आज जगभरात मुस्लिम बांधव मोठ्या आनंदात ईद साजरी करत आहेत. ईदच्या आदल्या दिवशी वाराणसी येथे राहणाऱ्या एका मुस्लिम अनाथ मुलीने भावनिक मेसेज जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. हा संदेश वाचून ते उत्तर देतील, अशी काडीमात्रही अपेक्षा तिला नव्हती. पण अगदी अनपेक्षितपणे जिल्हाधिकाऱ्यांसह सगळे तिच्या घरी ईद साजरी करण्यासाठी पोहोचले. वाराणसीमधल्या मंडुवाडीह इथे राहणाऱ्या शबानाने ईदच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकारी योगेश्वर राम मिश्र यांच्या मोबाईलवर एक संदेश पाठवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ईद हा आमच्यासाठी खूप मोठा सण आहे. ईदच्या दिवशी सगळे नवीन कपडे घालतील पण आमच्याकडे मात्र ईदसाठी नवीन कपडेही नाही. माझ्या आई वडिलांचा २००४ मध्येच निधन झालं. सगळे ईद साजरी करत असताना आमच्याकडे मात्र काहीच नाही. तुम्ही माझी परिस्थिती समजू शकाल अशी मी आशा करते. मला काही सुचत नव्हतं म्हणून मदतीसाठी मी तुम्हाला मेसेज केलाय’ असा संदेश शबानाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला.

वाचा : फेसबुकवर प्रोफाईल पिक्चरची चोरी रोखण्यासाठी ‘हे’ करा

हा संदेश वाचून जिल्हाधिकारीही भावूक झाले. शबाना फक्त २० वर्षांची आहे. गरिबीमुळे तिला आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, तिने एका छोट्याशा दुकानात नोकरी करायला सुरुवात केली. पण डेंग्यू झाल्याने तिची नोकरी सुटली. आपल्या लहान भाऊ आणि आजीसोबत राहणाऱ्या शबानाला इतरांसारखी आनंदात ईद साजरी करायची होती पण ना तिच्याकडे ईद साजरी करण्यासाठी पैसे होते, ना नवीन कपडे. ईदच्या दिवशी एका अनाथ मुलीच्या डोळ्यात येणारे अश्रू योगेश्वर यांना बघवले नाहीत. उपजिल्हाधिकारी सुशील कुमार गौड यांना या मुलीच पत्ता शोधून काढण्याचे आदेश त्यांनी दिली. सुशील यांनी शबानाचा पत्ता शोधून काढला आणि ईदच्या आदल्याच दिवशी शबाना आणि तिच्या भावासाठी कपडे, मिठाई घेऊन गौड तिच्या घरी पोहोचले. सुरुवातीला तर जिल्हाधिकाऱ्यांना पाहून शबाना घाबरलीच. पण नंतर मात्र तिला धक्काच बसला. आनंदात ईद साजरी करण्याची तिची इच्छा योगेश्वर आणि सुशील यांच्या रुपात पूर्ण झाली. या दोघांच्याही रूपाने अनोखी ईदी तिला मिळाली.

VIDEO: ‘महिला सिंघम’ने भाजपच्या ‘नेताजीं’ना दाखवला पोलिसी खाक्या

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim girl from varanasi gets eidi from dm yogeshwar ram mishra