-अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Old Man Abusing Police Viral Video: लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडिओ आढळला. व्हिडिओमध्ये मुस्लिम समुदायाचा एक व्यक्ती पोलिस कर्मचाऱ्याला धमकावताना दिसत आहे. कर्नाटकात काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर लगेचच मुस्लिमांची दादागिरी सुरु झाल्याचे म्हणत हा व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे. नेमका हा काय प्रकार आहे हे पाहूया…

व्हायरल Video नेमका आहे काय?

ट्विटर यूजर नरेन मुखर्जीने व्हायरल व्हिडिओ शेअर करतं कॅप्शनमध्ये म्हटले की, “काँग्रेसचा विजय, अजून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही आणि तरीही कर्नाटकात ही अवस्था आहे. “

बाकी यूजर्स देखील हा व्हिडिओ शेअर करत असल्याचे आमच्या लक्षात आले.

तपास:

आम्ही गूगल किवर्ड सर्चचा वापर करून आमचा तपास सुरु केला. आम्ही, ‘ये वर्दी उतारके मिल ले’ हे किवर्डस वापरून आम्ही तपास करण्यास सुरुवात केली, जे व्हिडिओ मधील माणसाने पोलिसाला म्हंटले होते. हे किवर्डस वापरून शोधल्यास आम्हाला फेसबुक वर एक पोस्ट मिळाली. हा व्हिडिओ १८ मार्च, २०२१ रोजी अपलोड करण्यात आला होता.

कॅप्शन मध्ये लिहले होते: बार – बार मिलती रही एक चुनौती — वर्दी उतार कर मिल ले.. (वारंवार एकच आव्हान दिले जातेय, वर्दी काढून भेटून दाखव) हा व्हायरल होत असलेल्या क्लिपचा सविस्तर व्हिडिओ होता. येथे अपलोड केलेला व्हिडिओ 1.57 मिनिटांचा होता. त्यावर सुदर्शन न्यूजचा वॉटरमार्क होता. व्हिडीओतील लोक मराठी बोलत असल्याचे आम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर कळले.

मराठी महाराष्ट्रातच मुख्यतः बोलली जाते, त्यामुळे हा कर्नाटकचा व्हिडिओ आहे, असा दावा गैर वाटत होता त्यामुळे आम्ही सुदर्शन न्यूजचे प्रोफाईलही आम्ही तपासले. हा व्हिडिओ खरोखर अपलोड केला गेला होता, परंतु व्हिडिओसह कोणताही संदर्भ दिलेला नव्हता.

त्यानंतर आम्ही फेसबुकचा वापर सर्च इंजिनप्रमाणे केला. तेच कीवर्ड वापरून, आम्ही व्हिडिओचे सर्वात जुने अपलोड शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्हाला आढळले की २० सप्टेंबर २०१८ रोजी Jubileehills Feroz Khan या फेसबुक वापरकर्त्याने व्हिडिओ अपलोड केला होता. तो पुन्हा त्याच दीर्घ आवृत्तीचा होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या ठिकाणचे नाव धुळे, महाराष्ट्र असे दिसत होते.

व्हिडिओवर 11 हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या होत्या. ज्यात आम्हाला केदार धनगर या वापरकर्त्याची मराठीत कमेंट आढळली. ” हा जळगाव मधील चोपडा बस स्टँडचा व्हिडीओ, आणि 3 वर्षा पूर्वी झालेलं म्याटर आहे फळ विक्रीवाल्याला पोलिस ने मारलं होत म्हणून झालेलं सगळं” असे या कमेंटमध्ये दोन वर्षांपूर्वी लिहिण्यात आले होते. जळगाव मधील १५ तालुक्यांमधील एक चोपडा आहे.

त्यानंतर आम्ही केदार धनगर यांचे फेसबुक प्रोफाइल तपासले आणि त्यांना संपर्क केला.

केदारने आम्हाला सांगितले, “जळगावातील चोपडा बसस्थानकाबाहेर ही घटना घडली. मी तेव्हा ११वीत होतो आणि तिथून जात होतो. या संपूर्ण घटनेचा मी साक्षीदार होतो. पण मी विरुद्ध दिशेने उभा होतो म्हणून मी व्हिडिओ मध्ये दिसत नाही. बसस्थानकाजवळ एका फळविक्रेत्याला पोलिसांनी मारहाण केली. याचा राग मनात धरून फळ विक्रेत्याने मदतीसाठी लोकांना बोलावले आणि त्यातील काहींनी पोलिसाला धमकावले.”

केदार पुढे म्हणाले की नंतर फारसे काही झाले नाही. आपण तिथे हजर असल्यामुळेच आपल्याला या घटनेची माहिती होती, अन्यथा कदाचित आपल्यालाही त्याबद्दल काही माहिती कळली नसती कारण कदाचित या घटनेची बातमीही आली नाही.

हे ही वाचा<< “२० हजार कोटी कोणाचे…” गौतम अदाणी व नरेंद्र मोदींच्या चित्रप्रदर्शनावर प्रचंड टीका; सत्य माहितेय का?

निष्कर्ष: एका व्यक्तीचा पोलिस कर्मचाऱ्याला धमकावतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ हा कर्नाटकचा नसून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्टँडचा व २०१८ सालचा आहे आणि हाच व्हिडीओ आता कर्नाटकच्या निकालानंतर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim man abusing police video giving threats says come without police uniform in jalgaon viral after karnataka election svs
Show comments