Pandharpur Wari : येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. यानिमित्त महाराष्ट्रात वारी सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भक्त पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. वारकरी भजन, भक्तिगीते आणि अभंग गीते म्हणत विठ्ठलाची आराधना करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर वारीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एक अनोखा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असलेली ही वारी वर्षानुवर्षांपासून चालणारी महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या वारीत जातिभेद किंवा धर्मभेद नसतो. येथे फक्त विठ्ठलाचे भक्त वारकरी असतात.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Prithvi Shaw Dance Video Viral of his 25th Birthday Party Trolled for Disciplinary Issues in Ranji Trophy
Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा वाढदिवसाच्या पार्टीत ‘तांबडी चामडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर होतोय ट्रोल, VIDEO व्हायरल

हेही वाचा : Optical Illusion : या निसर्गरम्य चित्रात लपली आहे एक मुलगी; क्लिक करून एकदा नीट पाहा..


व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक मुस्लीम व्यक्ती वारीत सहभागी झालेली दिसत आहे आणि एका वारकरी बांधवासोबत विठ्ठलाच्या भजनाच्या तालावर नाचताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल की वारकरी बांधवासोबत हा मुस्लीम व्यक्ती फुगडीसुद्धा खेळताना दिसत आहे. हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होणार. जात-धर्म बाजूला ठेवून मुस्लीम व्यक्ती वारीचा आनंद घेताना दिसत आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे, असे या व्हिडीओतून दिसून येत आहे.

हेही वाचा : रसगुल्ला भरवणे पडले महागात, नवरदेवाला भर मांडवात नवरीने चोपले!

@Samraatraao या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “संस्कृती महाराष्ट्राची #वारी”
युजरला हा व्हिडीओ खूप आवडला असून अनेक युजर्स हा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.